आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहयोगी बॅंकेच्या विलीनीकरणानंतर SBI बनेल जगातील 45 वी मोठी बँक, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात एक जागतिक बँक तयार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. एसबीआयमध्ये (स्टेट बँक ऑफ इंडिया) पाच सहयोगी बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसबीआय जगातील ५० मोठ्या बँकेच्या यादीत समाविष्ट होईल.
 
यामुळे पहिल्या वर्षभरातच बँकेची १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची बचत होणार आहे. या विलीनीकरणामुळे बँकेची कार्यक्षमता वाढेल तसेच निधी जमा करण्यासाठीचा खर्चही कमी होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली.  

भारतीय महिला बँकेचे एसबीआयमध्ये विलीनीकरणाच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नसल्याचे अर्थमंत्री जेटली यांनी सांगितले आहे. या विलीनीकरणाचा कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्यावर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सहयोगी बँकेचे ग्राहक एसबीआयच्या जागतिक नेटवर्कशी जोडले जाणार आहेत. या प्रस्तावाला या आधीच केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वत: मंजुरी दिली होती. त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी घेण्यात आली. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर मंत्रिमंडळाने या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला. बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठीच्या “इंद्रधनुष्य कार्य योजना’ या अंतर्गत ही मंजुरी देण्यात 
आली आहे.
 
या बँकेचे होणार विलीनीकरण  
- स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर - एसबीबीजे (लिस्टेड)  
- स्टेट बँक ऑफ म्हैसूर (लिस्टेड)  
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (लिस्टेड)  
- स्टेट बँक ऑफ पटियाला  
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद   

विलीनीकरणानंतर एसबीआय बनणार  ४५ वी मोठी बँक 
- काम करण्याची क्षमता वाढणार, निधी जमवण्यासाठी कमी खर्च येईल 
- पहिल्याच वर्षी एक हजार कोटी रुपयांहून अधिक बचत होणार 
-  एसबीआयची एकूण संपत्ती ३७ लाख कोटी रुपये होणार 
-  २२,५०० बँक शाखा आणि ५८,००० एटीएमचे मोठे नेटवर्क उभे राहणार 
-  सध्या एसबीआयच्या १६,५०० बँक शाखा आहेत. यात ३६ देशांमध्ये १९१ शाखा आहेत 
-  ग्राहकांची संख्या वाढून ५० कोटींहून अधिक होणार
 
संचालक मंडळाची मंजुरी  
एसबीआय संचालक मंडळाने गेल्या वर्षी चार सप्टेंबर रोजी सहयोगी बँका तसेच भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या आधी एसबीआयमध्ये २००८ ला स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रचे तर त्याच्या दोन वर्षांनंतर स्टेट बँक ऑफ इंदूरचे विलीनीकरण झाले होते.
 
विलीनीकरणाचा फॉर्म्युला 
-  एसबीबीजेच्या शेअर्सधारकांना दर दहा शेअर्सच्या मोबदल्यात एसबीआयचे २८ शेअर्स दिले जाणार. 
-  एसबीएम आणि एसबीटीच्या शेअर्सधारकांना दर दहा शेअर्सच्या मोबदल्यात एसबीआयचे २२ शेअर्स दिले जातील. 
- एसबीपी आणि एसबीएचसाठी शेअर्स स्वॅप किंवा रोख रक्कम दिली जाणार नाही. कारण या दोन्हींवर एसबीआयची पूर्ण मालकी आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...