आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान तिकीटावर 50 % सूट, एअर इंडियाची खास ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - असंख्य अडचणींचा सामना करणाऱ्या एअर इंडियाने कंपनीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून जास्तीत जास्त प्रवाशांनी एअर इंडियाला प्राधान्य द्यावे, यासाठी खास योजना सादर केली. या योजनेअंतर्गत प्रवाशांना विमानाच्या तिकीटावर 50 टक्के सूट दिली जात आहे. याव्यतरिक्त 25 किलो चेकइन बॅगसाठी कुठलेही चार्जेस आकारले जाणार नाहीत. या योजनेत तीन श्रेणींचा समावेश करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी, सैनिक आणि त्यांचे कुटूंबिय, सिनीअर सिटीजन्सचा समावेश आहे. 
 
 
या आहेत योजनेच्या नियम आणि अटी
- या योजनेचा लाभ सैनिक आणि त्यांच्या कुटूबियांना घेता येईल. मात्र, सेवानिवृत्त लष्कर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
- सिनीअर सिटीजन्समध्ये 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रवाशांना लाभ घेता येईल. 
- भारतात एखाद्या एक वर्षापेक्षा अधिक काळाकरिता पूर्ण वेळेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी. मात्र, त्यांचे वय 21 ते 26 वर्षे यादरम्यान असावे.
- डिस्काऊंट ऑफर केवळ इकॉनॉमी क्लाससाठी असेल. 
- अधिक माहितीसाठी www.airindia.in या वेबसाईटवर क्लिक करा. 
बातम्या आणखी आहेत...