आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरसेलचे २ जी स्पेक्ट्रम रद्द होण्याची शक्यता, विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने घातली बंदी, मलेशियाच्या संचालकाला फटकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एअरसेल कंपनीच्या २ जी स्पेक्ट्रम विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. यामुळे स्पेक्ट्रम बिझनेसपासून होणारे उत्पन्नदेखील कंपनीच्या संचालकांना आता मिळणार नाही. एअरसेलमध्ये ७४ टक्के भागीदारी असलेली मलेशियातील कंपनी मॅक्सिसचे मालक टी. आनंद कृष्णन यांना दोन आठवड्यांत हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. कृष्णन हजर राहिले नाही तर त्यांच्या कंपनीला दिलेले स्पेक्ट्रम रद्द हाेण्याची शक्यता आहे. हे प्रकरण एअरसेल-मॅक्सिस करारासंदर्भात आहे. कृष्णन तसेच त्यांचे मलेशियाई नागरिक आॅगस्टस राल्फ मार्शल यांच्यासह अनेक लोक यामध्ये आरोपी आहेत. अनेकदा समन्स पाठवल्यानंतरही हे सर्व न्यायालयात हजर झाले नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी रोजी होईल.
  
कोणताही व्यक्ती भारतातील राष्ट्रीय साधनांचा वापर करत असला आणि येथील कायदे मानत नसेल तर सहन केले जाणार नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. तर तुम्हाला (कृष्णन) स्पेक्ट्रमचा वापर करायचा असेल तर येथे येऊन कायद्याला सामोरे जा, असेही मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावले आहे.
  
या आदेशामुळे एअरसेलच्या ग्राहकांना कोणताही त्रास हाेऊ नये याकडे दूरसंचार मंत्रालयाने लक्ष द्यावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे. यासाठी आवश्यक असल्यास अशा ग्राहकांना दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कवर ट्रान्सफर केले जाऊ शकते. या आदेशाला मलेशियातील दोन मुख्य वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याचेही न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...