आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airtel ची 296 शहरांत 4G सेवा; 12 सेकंदांत डाउनलोड होईल तीन तासांचा Movie

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वा‍‍त मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने गुरुवारी देशातील 296 शहरांत 4G नेटवर्कची सेवा सुरु केली आहे. याआधी एअरटेलने 2012मध्ये देशात पहिल्यांदा कोलकात्यात 4G सेवा उपलब्ध केली होती.

4G इंटरनेट स्पीड इतकी फास्ट आहे की, युजर्स अवघ्या 12 सेकंदांत तीन तसांचा सिनेमा डाउनलोड करु शकतात. ग्राहकांना लवकरच 4G वर उच्च गतीच्या वायरलेस ब्रॉडबँड सेवेचा वापर करता येणार आहे. हाय डेन्सिटी व्हिडिओ, वेगाने अपलोडिंग आणि चित्रपट, संगीत आणि छायाचित्रे डाऊनलोड सेवेचा कोणत्याही अडथळ्याशिवाय उपयोग करू शकतील, असे एअरटेलने म्हटले आहे.

विंक मुव्हीज
एअरटेलने नवे अ‍ॅप ‘विंक मुव्हीज’ सादर करण्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली. या अ‍ॅप्लिकेशनमुळे हजारो चित्रपट आणि लोकप्रिय व्हिडिओ बघता येणार आहेत.

दुसरीकडे, रिलायन्स जिओने देखील 4G इंटरनेट सेवा देण्याची तयारी सुरु केली आहे. दुरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेत मात्र, इंटरनेट युजर्सला अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोरियात सुपर फास्ट 5G वायरलेस तंत्रज्ञानाची यशस्वीपूर्वक चाचणी घेण्यात आली. मात्र, या सेवाचा व्यावसायिक वापर होणार असल्याने पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
12 ते 15 सेकंदांत डाउनलोड होईल तीन तासांचा सिनेमा
4Gमध्ये इंटरनेटचा स्पीड 49 एमबीपीएसपर्यंत असेल. त्यामुळे 600-700 एमबीपर्यंतच्या तीन तासांचे सिनेमे डाउनलोड करण्‍यासाठी फक्त 12 ते 15 सेकंदांचा कालावधी लागेल.

4G इंटरनेटचा स्पीड इतका असेल की, इंटरनेट युजर एका तासांत 6 सिनेमे डाउनलोड करू शकतील, असा दावा 'एरिक्सन'च्या एका मोबिलिटी रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
2020 पर्यंत देशात 45 टक्के लोकांना मिळेल 4G सेवा
'एरिक्सन'च्या मोबिलिटी रिपोर्टनुसार, देशात इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. 2020 पर्यत देशभरात 45 टक्के लोकांना 4G सेवा उपलब्ध करून दिली जाईल.

पुढील स्लाइडवर वाचा, कोणत्या देशात मिळते 4G इंटरनेट