आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Airtel Girl Sasha Chetri Most Hated Girl On Internet

साशा छेत्री ठरली \'इरिटेटिंग 4G गर्ल\'; नेटिजन्सनी उडवली खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: एअरटेल 4G अॅडमध्ये साशा - Divya Marathi
फाइल फोटो: एअरटेल 4G अॅडमध्ये साशा
मुंबई- ब्रॅंड रेटिंग कंपनी 'गूंज इंडिया'ने नुकतीच 'मोस्ट हेटेड ब्रँड ऑफ 2015'ची यादी जाहीर केली आहे. यात एका टेलीकॉम कंपनीला 2015 मधील सर्वात हेटेड ब्रॅंड म्हणून घोषित केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरटेल 4G सर्व्हिसची जाहिरात करणारी मॉडेल साशा छेत्री हिला बहुसंख्य नेटिजन्सनी नापसंती दिल्याचे गूंज इंडियाने म्हटले आहे. इंटरनेट सर्व्हेत यूजर्सनी साशाला 'इरिटेटिंग 4G गर्ल' असेही संबोधले आहे.

जाणून घ्या कोण आहे साशा छेत्री?
- अल्पावधीत '4G गर्ल सेलिब्रिटी'च्या रुपात फेमस झालेल्या युवतीचे नाव साशा छेत्री असून ती उत्तराखंडमधील देहराडून येथील राहाणारी आहे.
- साशा 19 वर्षाची असून तिने मुंबईतील ज्येव्हियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनमधून अॅडव्हरटायजिंगमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
- साशा एक म्युझिक आर्टिस्ट देखील आहे. मात्र, एअरटेलच्या जाहिरातीत तिने पहिल्यांदाच काम केले होते.
- एअरटेल 4Gची जाहिरात 54406 वेळा टीव्हीवर दाखवण्यात आली.
- गेल्या दोन महिन्यांच्या काळात साशा टीव्ही स्क्रीन्सवर जवळपास 475 तास दिसली आहे. इंटरनेटवर देखील ही जाहीरात मोठ्या संख्येत पाहिली गेली.

सोशल मीडियावर साशाची उडवली खिल्ली...
Whatsapp, Twitter व Facebook वर साशाची नेटिजन्सनी तुफान खिल्ली उडवली आहे. एअरटेलच्या जाहिरातीवरून साशाच्या फोटोसोबत अनेक जोक्स शेअर करण्यात आले आहेत.

पुढील स्लाइड पाहा 4G गर्ल साशा छेत्रीची निवडक फोटोज् व साशासाठी आलेले ट्वीट....