आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरटेलला नॅशनल रोमिंगवर शुल्क नाही, देशभरात कॉल आणि डाटासाठी रोमिंग फ्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारती एअरटेलच्या वतीने १ एप्रिलपासून नॅशनल रोमिंगवर शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे कंपनीच्या ग्राहकांना देशभरात इनकमिंग आणि आऊटगोइंग कॉल आणि डाटासाठी रोमिंग चार्ज देण्याची गरज राहणार नाही. 
 
या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर एअरटेलच्या शेअर्समध्ये ३ टक्के घसरण नोंदवली गेली. 
जिओच्या  लाँचिंगनंतर कॉल आणि डाटा स्वस्त करण्यासाठी दुरसंचार कंपन्यांवर दबाव वाढला आहे. नॅशनल रोमिंग बंद झाल्यामुळे ग्राहक देशभरात एकच मोबाइल क्रमांक वापरू शकतील. सध्या रोमिंग चार्ज लागत असल्याने ग्राहक त्या त्या विभागात वेगवेगळ्या मोबाइल नंबरचा वापर करतात. एअरटेलने आंतरराष्ट्रीय कॉल दर ९० टक्के कमी केले आहेत. ३ रुपये प्रतिमिनिटाच्या हिशोबाने दर आकारले जातील.
 
काही प्रमुख देशांमध्ये डाटा चार्ज ९९ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. ३ रुपये प्रति एमबीच्या हिशोबाने दर आकारले जातील. भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये जवळपास ३ टक्के घसरण नोंदवण्यात आली. ३५७ अंकाच्या स्तरावर तो बंद झाला. भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल म्हणाले की, आम्ही आंतरराष्ट्रीय रोमिंगमध्ये बरेच बदल केले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...