आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Airtel Takes 1st Step Towards Govt\'s Launch Of MNP Scheme From Tommorrow

नॅशनल मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी 3 जुुलैपासून,एअरटेल, वोडाफोनकडून ग्रीन सिग्नल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- नॅशनल मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी अर्थात एनएमएनपी सुविधा 3 जुलैपासून देशभरात लागू होत आहे. एअरटेल आणि वोडाफोनने एनएमएनपी सुविधेला संमती दिली आहे. या दोन्ही मोबाइल नेटवर्क कंपन्या शुक्रवारपासून एनएमएनपी सुविधा सुरु करतील.

एनएमएनपी सुविधा लागू झाल्यानंतर युजरला सर्कल किंवा राज्‍याबाहेर गेल्‍यास मोबाइल नंबर बंद करून दुसरा नंबर घेण्याची गरज फासणार नाही. यासाठी डीओटीने मोबाईल ऑपरेटर्सच्‍या नॅशनल नंबरिंग प्‍लॅनमध्‍ये बदल केला जाणार आहे.
टेलीकॉम कंपनीने केली NMNP ची सुरूवात
देशभरातील मोबाईल युजर्सला आता सहज मोबाईल नंबर बदलता येईल, असे भारतीय एअरटेल कंपनीने जाहीर केले आहे.एअरटेलने सांगितले की, MNP मध्‍ये सुरूवातीला पोर्टींग निवेदन प्रक्रियेला गतीने पूर्ण करणे, रोमिंगवर इनकमिंग फ्री, बॅलेन्‍स ट्रान्सफर्स आणि कॅरी फॉरवर्ड ऑप्शन या सुविधांचा समावेश आहे. देशभरात 3 जुलैपासून NMNP सुविधा सुरु, असे रिलायन्सने जाहीर केले आहे.

एअरटेलच्‍या ग्राहकांसाठी दुसर्‍या शहरात गेल्‍यावर बॅलेन्‍स प्रीपेडमध्‍ये ट्रान्‍सफर करणे, पोस्‍टपेडच्‍या अनबिल्‍ड आणि बिल्‍ड रासीला कॅरी फॉरवर्ड करण्‍याचा पर्याय राहील. तसेच रोमिंगवर इनकमिंगची सुविधा देणार असल्‍याचे एअरटेलच्‍या डायरेक्‍टरने सांगितले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, असे करावे नॅशनल मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी..