आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alexandra Andresen World's Youngest Billionaires

अॅलेक्झांड्रा वयाच्या 19 व्या वर्षी 800 कोटींची मालकीण, नॉर्वेचे अब्जाधीशाची आहे मुलगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- ती जगातील सर्वात कमी वयाची अब्जाधीश आहे. मात्र, ती सिलिकॉन व्हॅलीमधील तांत्रिक तज्ज्ञ नाही की हॉलीवूडची हॉटशॉट अभिनेत्री नाही. घराघरांत ओळख असणारे नावही नाही. तरीदेखील फक्त वयाच्या १९ व्या वर्षी ती १.२ अब्ज डॉलरच्या (सुमारे ८०.८१ अब्ज रुपये) मालमत्तेची मालकीण आहे. अलेक्झांड्रा आंद्रेसन असे तिचे नाव असून ती नॉर्वेमध्ये एक व्यावसायिक घाडेस्वार आहे. फोर्ब्जने जगभरातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांची वार्षिक यादी जाहीर केली असून यामध्ये ती सर्वात युवा अब्जाधीश आहे. एकूण १,८१० लोकांच्या या यादीत अलेक्झांड्राला १,४७६ व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.
विशेष म्हणजे तिची बहीण कॅथरिना आंद्रेसनचे वय २० वर्षे असून तिच्याकडेदेखील इतकीच मालमत्ता आहे. फोर्ब्जने तिला युवा अब्जाधीशांच्या यादीत याच क्रमांकावर स्थान दिले आहे. वास्तविक, फर्ड होल्डिंग कंपनीमध्ये या दोघी बहिणींची ४२.२ टक्के भागीदारी आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण आहे अॅलेक्झांड्रा ..