आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डिजिटल इंडिया’त एकत्र दिसले अंबानी बंधू, अनिल यांनी व्यवस्थित केला पुतण्याचा टाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'डिजिटल इंडिया’त अनिल अंबानी यांनी पुतण्या आकाशचा टाय व्यवस्थित करतानाचा क्षण कॅमेरात कैद झाला. - Divya Marathi
'डिजिटल इंडिया’त अनिल अंबानी यांनी पुतण्या आकाशचा टाय व्यवस्थित करतानाचा क्षण कॅमेरात कैद झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘डिजिटल इंडिया’ सप्ताहाची सुरुवात केली. यावेळी मुकेश आणि अनिल अंबानींसह देशातील अग्रणी उद्योगपती मंचावर उपस्थित होते. अंबानी कुटुंबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोन्ही बंधुंसोबत मुकेश यांच्या पत्नी नीता, मुलगी ईशा आणि मुलगा आकाश एकत्र होते. यावेळी अनिल अंबानींनी कधी पुतण्या आकाशचा टाय व्यवस्थित केला तर, कधी मोठे बंधु मुकेश यांच्यासोबत चर्चा करताना दिसत होते.
2002 मध्ये धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश आणि अनिल यांना अब्जावधींची संपत्ती वारसाहक्काने मिळाली होती. मात्र दोन्ही भावांच्या नात्यामध्ये काही काळापूर्वी संपत्तीच्या वादावरुन दुरावा निर्माण झाला होता. या वाद एवढा वाढला होता, की रिलायन्स ग्रुपची वाटणी झाली. त्यानंतर बराच काळ दोघे भाऊ एकमेकांसमोर आले नाही. धीरुभाईंनी त्यांचे मृत्यूपत्र तयार केले नव्हते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर रिलायन्स साम्राज्याच्या उत्तराधिकार्‍यावरुन दोन्ही भावांमध्ये वाद निर्माण झाला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, डिजिटल इंडिया सप्ताहाच्या कार्यक्रमात कसे भेटले मुकेश आणि अनिल अंबानी