आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका, चीनपेक्षा देशात कमी कृषी उत्पादकता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिका, युरोप आणि चीनच्या तुलनेत भारताची कृषीतील उत्पादन क्षमता खूपच कमी आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारच्या वतीने अनेक प्रकारच्या योजनांवर काम करण्यात येत आहे. तरीदेखील चांगली कृषी अवजारे उपलब्ध नसल्यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादन कमी असल्याचे म्हणता येईल. देशातील सर्वाधिक कृषी भाग हा पावसावर अवलंबून आहे. या व्यतिरिक्त पीक तयार होण्यासाठी मिळणारा कमी कालावधी, वेगवेगळी कृषी तसेच जलवायू परिस्थितीदेखील त्यासाठी जबाबदार असल्याची माहिती कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. ते प्रश्नोत्तरादरम्यान प्रश्नांची उत्तरे देताना बोलत होते.
ज्या देशात पिकांचे उत्पादन जास्त होते, त्या देशात पीक घेण्याचा कालावधीदेखील जास्त असल्याचे सिंह यांनी सांगितले. अशा देशांमध्ये शेतीसाठी प्रगत औद्योगिक अवजारांचा वापर करण्यात येतो. याव्यतिरिक्त भारतात वातावरणातील ओलावा तसेच तापमान या समस्यांनादेखील तोंड द्यावे लागते. भारतात शेतकरी एकाच वर्षात एकापेक्षा जास्त पिकांच्या माध्यमातून उत्पादन घेत असल्याचे ते म्हणाले.

पिकांचे उत्पादन अत्यंत मंद गतीने वाढत आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना कृषिमंत्र्यांनी सांगितले की, पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) २६ प्रकारच्या कमोडिटीवर संशोधन करत आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशनसारख्या (एनएफएसएम) योजनादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत प्रत्येक राज्यांना तेथील विशेष धोरण ठरवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे.

Á देशात तांदळाचे उत्पादन प्रतिहेक्टर २,१९१ किलोग्रॅम, जागतिक सरासरी प्रति हेक्टर ३,०२६ किलोग्रॅम.
Á गव्हाचे उत्पादन प्रति हेक्टर २,७५० किलोग्रॅम, जागतिक सरासरी प्रति हेक्टर ३,२८९ हेक्टर किलोग्रॅम.
दुष्काळामुळे घसरण

वर्ष २००६-०७ मध्ये तांदळाचे उत्पादन प्रति हेक्टर २,१३१ किलोग्रॅम झाले होते. यामध्ये वर्ष २०१३-१४ पर्यंत वाढ हाेऊन उत्पादन प्रति हेक्टर २,४१६ किलोग्रॅमपर्यंत पोहोचले आहे.
यादरम्यान गव्हाचे उत्पादनदेखील प्रति हेक्टर २,७०८ मध्ये वाढीसह ३,१४५ किलोग्रॅमवर पोहोचले आहे. वर्ष २०१३-१४ आणि २०१५-१६ दरम्यान देशातील पिकांचे उत्पादन तसेच उत्पादकतेत दुष्काळामुळे घसरण नोंदवण्यात आली असल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...