आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Analysis : 30 वर्षांसाठी नियुक्ती असूनही मिस्त्रींची 4 वर्षांत गच्छंती, वाचा कारणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टाटा समूहाने त्यांचे आतापर्यंतचे सर्वात युवा अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना पदावरून का पायउतार केले, याचे अधिकृत कारण कंपनीकडून गुलदस्त्यातच आहे. तज्ज्ञांच्या मते हे रहस्यच आहे. सायरस मिस्त्री यांना अध्यक्ष बनवण्यात आले होते तेव्हा त्यांची योग्यता व विनम्रतेसोबतच त्यांचे कमी वय ही जमेची बाजू होती. ३०-४० वर्षांपर्यंत कंपनीचे नेतृत्व सांभाळता यावे, यासाठी कमी वयाची व्यक्तीच या पदी नेमण्यास निवड समितीचे प्राधान्य होते. ४३ वर्षीय सायरस यात खरे उतरले होते. मात्र, चारच वर्षांत त्यांना पायउतार करण्यात आले.
रतन टाटांसमोर अनेक आव्हाने..
नव्या अध्यक्ष मिळेपर्यंत रतन टाटा कार्यकारी अध्यक्ष असतील. शक्यतो ते आता समुहातीलच व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती करू शकतात. सायरस यांच्या कार्यकाळात कर्ज वाढून ते २४.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहे. समूहाचा टर्नओव्हर वाढवणे हेदेखील आव्हानच असेल, जो १०८ अब्ज डॉलरवरून कमी होऊन १०३ अब्ज डॉलर नोंदवण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा,
संचालक मंडळ मिस्त्री यांच्यावर नाराज असण्याची 5 संभाव्य कारणे..
कोण कोण आहे मिस्त्रींना हटवणाऱ्या संचालक मंडळात..
नव्या अध्यक्षाच्या शोधाचे आव्हान...
आजवर होऊन गेलेले टाटा समुहाचे अध्यक्ष...
सोशल मीडियावर कशा आल्या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...