नवी दिल्ली/मुंबई- बिझनेसमध्ये विभक्त झालेले अंबाधी बंधु तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहे. मुकेश अंबानी यांची 'रिलायन्स जिओ' आणि अनिल अंबानी यांची कंपनी कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आता एकत्र काम करणार आहे. अंबानी बंधु 2005 पासून बिझनेसमध्ये विभागणी झाली होती. दोन्ही कंपन्यांमध्ये 'व्हर्च्युअल मर्जर' करार झाला असून टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर वाटून घेणार आहेत.
Jio-RCom असे एकत्र करतील काम...
टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रिलायन्स कम्युनिकेशनचे मोबाईल टॉवर्स, ऑप्टीकल फायबर नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि रिलायन्स जिओच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि फोर जी एलटीई सेवेचा समावेश आहे. जिओ आणि आरकॉम या दोन्ही कंपन्या आता एकत्रित काम करणार असल्याची माहिती अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या शेअर होल्डर्सना दिली आहे.
धीरूभाईंचे स्वप्न साकार करणार
जिओ आणि आरकॉम या दोन्ही कंपन्यांत झालेल्या कराराविषयीची माहिती अनिल अंबानी यांनी खुद्द 'रिलायन्स ग्रुप'वर पोस्ट केली आहे. भाऊ मुकेश अंबानी यांच्यासोबत मिळून आपण वडील धीरूभाई अंबानी यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे अनिल अंबानी यांनी सांगितले. या करारामुळे दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, रिलायन्स जिओने 5 सप्टेंबरला आपली बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 4G सेवेची अधिकृत घोषणा केली होती.
एक दशकापूर्वी अंबानी बंधु झाली होती वाटणी...
- 18 जून 2005 रोजी अंबानी बंधुमध्ये बिझनेसची वाटणी झाली होती. देशातील सर्वात मोठा हायप्रोफाइल फॅमिलीची वाटणी म्हणून जोरदार चर्चाही झाली होती.
- तेव्हापासून मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी दोघे स्वतंत्र बिझनेस करत आहेत.
- वाटणीत टेलिकॉम, पॉवर आणि फायनान्शियल बिझनेस अनिल अंबानी यांना तर ऑईल आणि पेट्रोकेमिकल्स बिझनेस मुकेश अंबानी यांना मिळाला होता.
पुढील स्लाइडवर वाचा, अनिल अंबानी म्हणाले, कंपनीसाठी स्वत:सोबत भाग्य घेऊन आला अनमोल...