आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Announced The Results Of Voting No, Cyrus Mistrinci Absence Mistrince \'future\' Off Into The Mind Of The TCS Share Holders,

मतदानाचा निकाल जाहीर नाही, सायरस मिस्त्रींची अनुपस्थिती मिस्त्रींचे ‘भवितव्य’ टीसीएस शेअरधारकांच्या मतपेटीत बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अतिशय नाट्यमय घडामोडीदरम्यान मंगळवारी झालेल्या टीसीएसच्या ईजीएममध्ये शेअरधारकांनी सायरस मिस्त्री यांना संचालक पदावरून काढण्यासाठी मतदान केले. मिस्त्री या बैठकीत गैरहजर राहिले तर रतन टाटा पहिल्या रांगेत बसलेले दिसले.
कंपनीच्या वतीने मतदानाची आकडेवारी तत्काळ जाहीर करण्यात आली नसली तरी या कंपनीत टाटा सन्सची ७३.३३ टक्के भागीदारी असल्यामुळे मिस्त्री यांचे जाणे निश्चितच मानले जात आहे.
टाटा समूहाच्या कंपनीची मिस्त्रींना हटवण्यासाठी बोलावण्यात आलेली ही पहिलच ईजीएम बैठक आहे. या बैठकीचे अध्यक्षपद अंतरिम अध्यक्ष इशात हुसेन यांच्याऐवजी स्वतंत्र संचालक अमन मेहता यांच्याकडे सोपवण्यात आले होते.
मिस्त्री यांच्यावरील टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टचा विश्वास उडाला होता. त्यामुळे त्यांचे काम आणि क्षमता हा मुख्य मुद्दा नसल्याचे मत मेहता यांनी व्यक्त केले. ज्या समूहाने त्यांना अध्यक्ष बनवले होते, त्याच समूहाचा त्यांच्यावरील विश्वास उडाल्यामुळे त्यांचे जाणे टीसीएसच्या फायद्याचेच असल्याचे ते म्हणाले.

मिस्त्रींना अल्पसंख्याक शेअरधारकांचे समर्थन : अनेक अल्पसंख्याक शेअरधारकांनी मिस्त्री यांचे समर्थन केले आहे. या बैठकीत बसलेले लोक स्वत: विचार करत नसून विचार करण्यासाठी ते इतरांवर अवलबून असल्याचे मत आदिल ईरानी नावाचे एक शेअरधारक म्हणाले.
मी तीन - चार प्रश्न विचारले होते, त्यांची उत्तरे कोठे आहेत? तुम्ही हवेत गप्पा मारत आहात. तुम्ही आपल्या चालकाला किंवा शिपायालाही या पद्धतीने काढू शकता का? मिस्त्री माझे अध्यक्ष आहेत. त्यांना काढण्यामागचे मुख्य कारण मला माहिती असायला हवे. एक शेअरधारक म्हणाला की, बहुमत नेहमीच योग्य असते असे नाही. आपण ही लढाई कदाचित जिंकू शकतो मात्र, युद्धात आपला पराजय होत आहे.

टाटा समूहाचा आत्मा वाचवण्यासाठी लढतोय : मिस्त्री
ईजीएममध्ये कंपनीचे सचिव सायरस मिस्त्री यांचे पत्र वाचून दाखवण्यात आले. अलीकडच्या काळात टाटा समूहातून ‘गुड गव्हर्नन्स’ गायब होताना दिसत आहे. ती जागा मनमौजी आणि व्यक्तिगत धोरणाने घेतली आहे. मी टाटा समूहाचा आत्मा वाचवण्यासाठी लढा देत आहे. मिस्त्री यांनी शेअरधारकांना अापल्या विवेकाच्या आधारावर मतदान करण्याचे आवाहन केले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...