आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना प्रामाणिकपणासाठी प्रोत्साहित करणारे अॅप फेसबुकने 650 कोटींत केले खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलनो पार्क(कॅलिफोर्निया)- अमेरिकी किशोरवयीनांना प्रामाणिक बनवण्यासाठी प्रोत्साहित करणारे अॅप “टीबीएच’(टू बी ऑनेस्ट) फेसबुकने खरेदी केले आहे. अॅप केवळ ९ आठवड्यांपूर्वीच लाँच झाले होते, त्यामुळे या व्यवहाराला महत्त्व प्राप्त झाले आहे. या काळात हे अॅप ५० लाख वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. दररोज याचे २५ लाख युजर्स सक्रिय आहेत. यामध्ये बहुतांश शालेय विद्यार्थी आहेत. या स्टार्टअपचे चारही सहसंस्थापक आता फेसबुकचे कर्मचारी झाले आहेत. स्टार्टअप न्यूज साइट टेक क्रंचनुसार, हा व्यवहार ६५० कोटी रुपयांत झाला आहे.  

अॅपचे संस्थापक निकिता बियर, एरिक हॅजार्ड, कायले जारागोजा व निकोलस ड्यूस्डोडोन आता फेसबुक मुख्यालयात बसून आपले अनोखे अॅप आणखी क्रियाशील करतील. निकिता यांनी सांगितल्यानुसार, फेसबुकसोबतच्या बैठकीत लोकांशी जोडण्यात त्यांचा व आमचा दृष्टिकोन समान आहे. बहुतांश लोकांना जोडण्याचा आमचा उद्देश फेसबुकसोबत यशस्वी होईल. फेसबुकने म्हटले की, टीबीएच पोल व मेसेजिंगची अल्पवयीनांवर पडलेली छाप कौतुकास्पद आहे. फेसबुकसोबत सकारात्मक अनुभवांचा प्रवास सकारात्मक उंचीवर घेऊन जाईल. याच्या जनमतात १०० कोटींहून जास्त वेळा उत्तरे मिळाली आहेत. कुमारवयीन मुलांना ऑनलाइन चर्चा सकारात्मक हवी असल्याचे अॅपच्या यशातून दिसते.  

माेजकाच पैसा शिल्लक होता, मात्र, टीबीएचने वाचवले 
टीबीएच आकारास आणणारे चौघे मित्र २०१० पासून सोबत आहेत. चौघांनी मिडनाइट लॅब्ज कंपनीची स्थापना केली होती. कंपनी पर्सनल फायनान्स व कॉलेज चॅटसारखे अॅप बनवत होती. मात्र, २०१३ पर्यंत कंपनीची स्थिती बिकट हाेऊ लागली. अनेक मोठ्या गुंतवणुकीनंतरही कंपनी विशेष काही करू शकली नाही आणि २०१७ पर्यंत पैशाची चणचण जाणवू लागली. ऑगस्टमध्ये तर दोन महिने चालवण्याइतपतच पैसे होते. या दरम्यान सकारात्मकतेला चालना देणारे अॅप तयार करावे, असे चौघांनी ठरवले. यातूनच टीबीएचा जन्म झाला. टीबीएचचे पहिले सादरीकरण जॉर्जियाच्या एका शाळेत करण्यात आले. ४०% विद्यार्थ्यांनी त्याच वेळी डाउनलोड केले. दुसऱ्या दिवशी तीन शाळांनी व नंतर अल्पावधीत ३०० शाळांनी अॅप घेतले. युजर अॅप डाउनलोड करतो तेव्हा त्यात फ्रेंड लिस्टही होते. अॅपवर सकारात्मक प्रश्न दिसतात. उदा. तुम्हाला अडचणीतही कोण हसवू शकतो? युजरसमोर उत्तरासाठी ४ पर्याय असतात. तो उत्तर निवडतो तेव्हा कोणी प्रतिक्रिया दिली याचा संदेश येतो. मात्र, तो कुणी पाठवला तो कळणार नाही. 
बातम्या आणखी आहेत...