आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपल आयफोन-8, एलटीई वॉच, टीव्ही लाँच करणार; स्टीव्ह प्रेक्षागृहामध्ये पहिला कार्यक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुपर्टिनो, कॅलिफोर्निया-  अॅपल १२ सप्टेंबर रोजी आयफोन-८, एलटीई वॉच आणि टीव्ही लाँच करणार आहे. हा कार्यक्रम नवीन स्पेसशिप कॅम्पसमध्ये तयार करण्यात आलेल्या स्टीव्ह जाॅब्ज  प्रेक्षागृहामध्ये हाेणार आहे. नवीन कॅम्पसची कल्पना स्टीव्ह जॉब्ज यांचीच असल्याने  प्रेक्षागृह त्यांना समर्पित करण्यात आले आहे. या  प्रेक्षागृहातील पहिला फोटो जारी झाला आहे. येथील खुर्च्या नैसर्गिक लाकडापासून बनवण्यात आल्या आहेत. समोर मोठे व्यासपीठ असून येथेच सीईओ टीम कुक नवीन उत्पादने सादर करतील. या रंगमंचाचा समोरचा भाग स्पेसशिप कॅम्पसच्या बाजूने ठेवण्यात आला आहे. येथून घनदाट झाडी दिसते. याचा मोठा भाग जमिनीखाली आहे. कॅम्पसमधील सर्वात उंच जागेवर हे बनवण्यात आले आहे. सामान्यांसाठी हे पहिल्यांदाच उघडले जाणार आहे.
 
१००० दर्शकांची क्षमता असलेले प्रेक्षागृह 
२० फूट उंच असलेली िलेंड्रिकल काच लावण्यात आलेले प्रवेशद्वारावर  
१६५ फूट आहे या प्रेक्षागृहाचा एकूण व्यास
 
- लाँचिंगनंतर पाहुण्यांना डिव्हाइसचा वापर करून पाहता यावा यासाठी व्यासपीठ मोठे ठेवण्यात आले आहे.  
- १,२०,००० स्क्वेअर फुटांमध्ये बनलेले प्रेक्षागृह. याचे छत एकसंघ आहे.  
-  हा कार्यक्रम नव्या अंदाजामध्ये लाइव्ह करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.  
- या आधी बिल ग्राहक सिव्हिक ऑडिटोरियममध्ये होत होते अॅपलचे लाँचिंग.  
- ७ हजार पाहुणे बसण्याची जागा होती जुन्या प्रेक्षागृहामध्ये.  
बातम्या आणखी आहेत...