आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवीण राव यांना ‘एमडी’पद देण्यासाठी इन्फोसिस घेणार शेअरधारकांची मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इन्फोसिसने यूबी प्रवीण राव यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) नियुक्ती करण्यासंदर्भात समभागधारकांकडून परवानगी मागितली आहे. त्यासाठी इन्फोसिसने समभागधारकांना टपाली मतपत्रिका जारी केल्या आहेत. समभागधारक ८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरदम्यान मतदान करू शकतील. निकाल ९ ऑक्टोबर रोजी घोषित केला जाईल.
 

इन्फोसिसने म्हटले आहे की, ‘यूबी प्रवीण राव हे कमाल  पाच वर्षे किंवा नव्या सीईओ आणि एमडीची नियुक्ती होईपर्यंत इन्फोसिसचे हंगामी सीईओ आणि एमडी असतील. राव यांना पदावरून हटवण्यात आले किंवा त्यांनी स्वत: पद सोडल्यास संबंधित पक्षास किंवा अन्य पक्षाला ९० दिवसांची नोटीस द्यावी लागेल.’ प्रवीण राव सध्या इन्फोसिसमध्ये मुख्य क्रियान्वयन अधिकारी (सीओओ) आहेत. इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी केलेल्या आरोपानंतर विशाल सिक्का यांनी १८ ऑगस्ट रोजी कंपनीच्या सीईओ आणि एमडीपदाचा राजीनामा दिला.
बातम्या आणखी आहेत...