आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारीपेक्षाही स्वस्त पडू शकते टॅक्सीचे भाडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याकडे स्वत:ची मोटार असावी असे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचे स्वप्न असते. पहिल्यांदा मोटारसायकल किंवा स्कूटर, त्यानंतर मोटार. कोणत्याही वाहनाचे मालक होणे हे त्या व्यक्तीसाठी स्टेटस सिम्बॉल आणि गरज असे दोन्ही असते. कारण वाहनामुळे शहरात जा-ये करण्याची त्यांची व्यक्तिगत गरज पूर्ण होते. खासकरून अशा शहरांमध्ये जिथे सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नाही आणि रस्ते गर्दीने भरून गेले आहेत. सध्या एक नवा पर्याय उपलब्ध होऊ लागला असून तो म्हणजे स्मार्टफोनवर अॅप डाऊनलोड करून टॅक्सी मागवण्याचा.
उबेर, ओला, मेरू , टॅबकॅबसारख्या कंपन्या अॅप आणि टॅक्सीमालक यांच्यात अॅपच्या माध्यमातून मध्यस्थीचे काम करीत आहेत. तुमच्या स्मार्टफोनचे बटण दाबून टॅक्सी मागवू शकतो. अंतराळातून सॅटेलाइट, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) च्या माध्यमातून आपण कोठून फोन करताय हे तपासून बघितले जाते आणि तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर टॅक्सी पाठवली जाते. आता प्रश्न हा पडतो की, जर तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने जर टॅक्सी मिळत असेल तर मग अॅपच्या मदतीने टॅक्सी का मागवायची याची अनेक कारणे सांगता येतील. पारंपरिक टॅक्सी अथवा रिक्षा जुनाट किंवा खराब स्थितीत असू शकतात. किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी जाण्याची ड्रायव्हरची तयारी नसेल. कदाचित तुम्ही टॅक्सी स्टँडपासून दूर राहत असाल आणि तेथपर्यंत पोहोचण्यासाठी बरीच पायपीट करावी लागत असेल. पण अॅपवर आधारित टॅक्सी (आणि आता रिक्षाही) मुळे अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत नाही. आता कॅबचा चालक तुम्हाला सेवा देण्यास नकार देऊ शकत नाही आणि तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी पोहोचवण्यासाठी योग्य बिल देऊ शकतो. कारण अशा प्रकारच्या अॅप टॅक्सीमध्ये नेव्हिगेशनसाठी जीपीएस उपकरण लावण्यात आले असते. त्यामुळे ड्रायव्हर सगळ्यात कमी अंतराच्या रस्त्यावरून तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचवू शकतो.

टॅक्सी कंपन्या प्रत्येक मिनिटाला ती टॅक्सी ट्रॅक करू शकतात. एक मुख्य गोष्ट, आता अॅपवर आधारित टॅक्सीच्या तुलनेत मोटारमालक होणे महाग ठरू लागले आहे. त्यातूनही अशा स्थितीत की तुम्हाला मोटार चालवण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता आहे. बहुतांश मोटारमालक पेट्रोलचा वापर हाच त्यांचा खर्च आहे असे समजतात. जेव्हा की वास्तविक खर्चामध्ये मोटार कर्जाचा ईएमआय, देखभाल, विमा आणि मोटारीचे घटते मूल्य यांचाही समावेश होत असतो. समजा की तुम्ही चार लाखांचे कर्ज आणि तुमचे स्वत:चे एक लाख रुपये असे मिळून पाच लाख रुपयांची मोटार खरेदी केली. तुम्हाला कर्जावरील व्याजापोटी १२ टक्के याप्रमाणे १.३३ लाख रुपये द्यावे लागेल. याचा अर्थ प्रतिमहिना २,२१६ रुपये. पाच वर्षात मोटारीचे मूल्य ते २.५ लाख रुपये होईल. याचा अर्थ घटत्या मूल्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला ४.१६६ रुपयांचा भार सहन करावा लागेल. यामध्ये विमा आणि सर्व्हिसिंगच्या १,५०० रुपयांच्या खर्चाचा समावेश केला तर मोटार मालक होण्याचा तुमचा मासिक खर्च ७,८८२ रुपये हेते. आता यामध्ये इंधन आणि पार्किंग शुल्काचा समावेश करा. समजा की तुम्ही महिन्यातले २५ दिवस रोज २० किलोमीटर मोटार चालवता आणि शहरात त्याचे प्रतिलिटर १२ किलोमीटर अॅव्हरेज मिळते. पेट्रोलचा भाव ७० रुपये लिटर गृहीत धरला तर त्यानुसार तुम्हाला महिन्याला २,९१६ रुपये आणि पार्किंग अंदाजे ५०० रुपये आणखी खर्च करावे लागत असतील. अशा प्रकारे मोटारीचे मालक होण्यासाठी तुम्हाला ११,२९८ रुपये (७,८८२ +२,९१६+५००) खर्च येणार. त्यातून जर तुम्ही ड्रायव्हर ठेवला तर त्यासाठी महिना १० ते १२ हजार रुपये खर्च करावा लागणार. अन्य शब्दांत सांगायचे तर मोटारीचे मालक बनण्यासाठी तुम्हाला एकूण ११ हजार ते २३ हजार रुपयांच्या दरम्यान खर्च करावा लागणार.

दुसरीकडे जर तुम्ही आला किवा उबेरसारख्या अॅपवर आधारित टॅक्सी किवा रिक्षा याचा वापर करत असाल तर त्यासाठी जास्त खर्च होण्याची शक्यता नाही. आणखी एक ध्यानात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर तुम्ही अगदीच घाईत नसाल तर लोकल, बस किंवा रिक्षा वापरण्यासारखे पर्यायही तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. सरळ शब्दांत सांगायचे तर गर्दीच्या शहरांमध्ये आता ‘मोटार मालक’ होण्याची आशा आता पहिल्यासारखी राहिलेली नाही.
rjagannathan@dbcorp.in
लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.
बातम्या आणखी आहेत...