आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल बँकिंग अन् मोबाइल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडे, मी जेव्हा व्यावसायिकांच्या एका समूहाला विचारले की त्यांनी त्यांच्या बँकेच्या शाखेला शेवटच्या वेळी केव्हा भेट दिली होती, तर त्यातील बहुतेकांना ते आठवतदेखील नव्हते. तथापि, मी तो प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीने फिरवून विचारले की त्यांच्या मोबाइलचा वापर करत त्यांनी शेवटच्या वेळी कधी त्यांच्या बँकेशी संपर्क साधला होता, तर त्यांचे उत्तर काही तासांपासून एका आठवड्यापर्यंत होते. हे भारताचे बदलते वास्तव आहे. ९५० कोटींपेक्षा अधिक जोडण्यांसह आणि ३०० कोटींपेक्षा अधिक स्मार्टफोन्ससह भारत सर्वात जलद वाढणारी स्मार्टफोन्सची बाजारपेठ बनला आहे. हा नाट्यमय बदल होण्यामागे (जनधन योजना, आधार आणि मोबाइल) यांच्या एकत्रीकरणाबरोबरच डिजिटल इंडियासारख्या सरकारी योजनांचा विशेष वाटा आहे. प्रत्येक बँक खात्याला जोडलेल्या "आधार' ओळखमुळे केंद्रित झालेले ध्यान याच्यामुळे झाला आहे. प्रत्येक भारतीयासाठी बँक या ओळखीने प्रत्येक भारतीयाला फार मोठा लाभ मिळवून दिला आहे. त्यात या खात्यांद्वारा सरकारच्या विविध अनुदानांची आणि आर्थिक साहाय्याची रक्कम थेट जमा होते. डेटा नेटवर्कनेही स्मार्टफोनला अधिक स्मार्ट बनवले आहे. डेटा आणि स्मार्टफोनच्या वाढीमुळे व्यवसायांचे नवे प्रकारदेखील निर्माण झाले आहेत.

मोबाइल बँक उत्पादनाच्या केंद्रस्थानी
मोबाइल आणि डेटा अंगीकारण्यातील वाढीमुळे बँकांनी आपल्या उत्पादनांना आणि ऑफर्सना मोबाइल फोन्सना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यास सुरू केले आहे. पाच वर्षांपूर्वी मोबाइल बँकिंग केवळ एसएमएस आणि यूएसएसडीपुरते मर्यादित होते; परंतु आज प्रत्येक बँकेकडे प्रत्येक प्रकारच्या ग्राहकाची गरज लक्षात घेऊन बनवलेले बहुविध मोबाइल अॅप्स आहेत. उपकरणांची व्यापक श्रेणी आणि ऑपरेटिंग सिस्टिम्स वापरून बँका अँड्रॉइड, आयओएस, विंडोज आणि ब्लॅकबेरी यांच्यासाठी हे अॅप्स बनवतात. हे अॅप्स सुरुवातीला शिलकीची चौकशी, निधीचे हस्तांतरण, बिल्सचे पेमेंट, सावधी जमा आणि धनादेश पुस्तिकेसाठी विनंती यांच्यासारखे साधे व्यवहार आणि सेवा देण्यापर्यंत मर्यादित होते. तथापि, जसा ग्राहकांकडून त्यांचा वापर वाढला तसे बँकांनी अधिक वैशिष्ट्ये जोडण्यास सुरुवात केली. आज अनेक बँका ७० ते ८० प्रकारचे विविध व्यवहार फोनवर देऊ करतात.