आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्य दरी म्हणजेच महामंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राजन यांनी सांगितले होते की, जगात पुन्हा एकदा १९२९ सारखी मोठी महामंदीची स्थिती येऊ शकते. या महामंदीला कसे नियंत्रित करता येऊ शकते? ग्रीस पूर्णत: सध्या महामंदीमुळे कोसळण्याच्या कडेवर आहे. तिथे ११ हजार कोटी रुपयांच्या जवळपास कर्ज त्या देशावर झाले आहे आणि तो देश कर्ज तो चुकवण्यास असमर्थ झाला आहे. याचा निश्चितपणे जगभरावर परिणाम होणार आहे आणि त्यामुळे एकवार पुन्हा जग महामंदीने घेरले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत जीडीपी (देशाचे एकूण उत्पादन), रोजगार, उत्पन्न, गुंतवणूक आणी किमतींमधील उतार -चढावाचा खेळ चालत असतो. जेव्हा एखाद्या देशाचा जीडीपी सलग दोन तिमाहींपर्यंत पडतो, घसरतो यालाच मंदी म्हणतात. जर हीच मंदी दीर्घकाळापर्यंत चालली तर ती महामंदीचे रूप घेते. असे म्हटले जाते की जर शेजाऱ्याची नोकरी सुटली तर याला मंदी म्हणा आणि जर का तुमची नोकरी सुटली तर त्याला म्हणा महामंदी. जर का जीडीपी १० टक्क्यांपेक्षा अधिक नसेल तर ३ ते ४ वर्षांपर्यंत सतत जीडीपी पडली तर त्याला महामंदी म्हटले जाते.

अशी सुरू झाली १९२९ ची महामंदी
१९२९ च्या प्रारंभी अमेरिकी लोकांच्या मागणीत घट आली आणि उद्योगांकडे मोठा उत्पादनांचा स्टॉक जमा होण्यास सुरुवात झाली. त्याच वेळी अमेरिकी शेअर बाजार सट्टेबाजीमुळे शिखरावर होता. मात्र २४ ऑक्टोबर १९२९ ला शेअर बाजारातील तेजीचा फुगा फुटलाच. याच दिवशी अमेरिकन शेअर बाजारात जवळपास १ कोटी ३० लाख शेअरची देवाणघेवाण झाली. या दिवसाला काळा मंगळवार असेही संबोधले जाते. यामुळे वॉल स्ट्रीटवर एकच गोंधळ उडाला. लाखो शेअरधारकांच्या शेअरची किंमत मातीमोल झाली. एवढ्या शेअरच्या किमती आपटल्याने गुंतवणूकदार कंगाल झाले. स्टॉक मार्केट पडल्यानंतर ग्राहक वाईट रीतीने तुटुन पडला. ग्राहकांच्या मागणीत घट आल्याने उद्योगधंदे बंद होऊ लागले, बेरोजगारी वाढायला लागली. अमेरिकी जनतेला खर्चासाठी कर्ज काढावे लागले, पण फेडण्यास जनता असमर्थ होती. १९३३मध्ये अमेरीकेत जवळपास १.५ कोटी लोक बेरोजगार होते. अर्ध्यावर बँका बंद झाल्या. त्यामुळे किंमती ३३ टक्के कोसळल्या.

अशी पसरली जगात महामंदी
अमेरिकेला शिंक येते तेव्हा पूर्ण जगाला सर्दी होते, असे म्हटले जाते. अनेक देश, मुख्यत्वे पश्चिम युरोपीय देश व जपान आपल्या उत्पादनाचा एक मोठा भाग अमेरिकेला निर्यात करतात. १९२९ मध्ये मंदीमुळे अमेरीकेत उत्पादनांची मागणी घटल्यामुळे या देशांची निर्यातही घटली आपल्या देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्यासाठी अमेरीकेने आयात शुल्कातही वाढ केली. हे पाहुन जगातील अन्य देशांनीही आयात शुल्कात वाढ केली. यामुळे सगळ्या देशांची निर्यात घटल्याने जवळपास सर्वच विकसित देशांमध्ये मंदी पसरायला लागली.

निर्यातीत वाढ व आयात कमी करण्यासाठी या देशांनी आपल्या चलनाची किंमत कमी करायला सुरवात केली. ज्याला रुपयाचे अवमुल्यन म्हणतात. समजा तुम्ही जपानमधुन एक मोबाईल फोन आयात करु इच्छिता तर जापानचे येन या चलनाची किंमत कमी झाली. तर जपानी मोबाईलही स्वस्तात मिळतो व जपानच्या निर्यातीत वाढ होते. पण जसे जपान आपल्या चलनाचे अवमुल्यन करतो. तर जगातील बाकी देश ही आपली निर्यात वाढवून आयात कमी करण्यासाठी चलनाचे अवमुल्यन करायला सुरवात करतात. याला स्पर्धात्मक अवमुल्यन असे म्हणतात. शेजारील देशापेक्षा आपली आयात कमी करुन निर्यात वाढावी असे प्रत्येक देशाला वाटते. म्हणजेच मंदीत सापडलेल्या या गरीबाला वा भिकारी झालेल्या देशाला काहीही चॉईस (निवड) नसते. हेच जागतिक महामंदीच्यावेळी झाल्यामुळे यात सर्वंच देशांचे नुकसान झाले.
महामंदीतून सावरण्याचा उपाय
१९२९ च्या पूर्वी असे मानले जाई की, अर्थव्यवस्थेत मागणी घट होऊच शकत नाही व मंदीही येऊ शकत नाही. १९२९ च्या पूर्वी हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्रात पीएच.डी तेव्हात मिळत होती जेव्हा संशोधक विद्यार्थी आपला यावर विश्वास आहे असे या मान्यतेवर विश्वास आहे असे लिहून द्यावे लागे. १९२९ ते १९३३ पर्यत जगात महामंदीच्या फेऱ्याने अर्थव्यवस्थेत घट होऊच शकत नाही वा महामंदी येऊच शकत नाही या मान्यतेला खोटे ठरवले. या मान्यतेवर िवश्वास ठेवतो असे म्हणणाऱ्या संशोधक िवद्यार्थ्याला १९२९ नंतर कधीही पीएच.डी मिळाली नसती. या दरम्यान अर्थशास्त्रज्ञ जाॅन मेनार्ड कीन्च्स यांनी सिद्धांत सादर केला. ग्राहक उद्योगधंद्याकडे उत्पन्न तर असू शकते. मात्र त्यांनी पूर्ण उत्पन्न खर्च करावे याची गरज नाही, यावर हा सिद्धांत आधारित होता. अशा स्थितीत मागणीत घट होऊन उद्योगांकडे साठा होऊ शकतो. या कारणामुळे उत्पादन कमी करून लोकांना नोकरीवरून काढल्या जाऊ शकते.
मंदीतून बाहेर पडण्यासाठी सरकारने खर्च वाढवून कर कमी केले पाहिजे असा सल्ला लाॅर्ड कीन्स यांनी दिला. याला राजकोषीय धोरण म्हणता येईल. सरकारला वाटले तर ते लोकांना खड्डे खोदून ते पुन्हा भरायला सांगू शकते. मात्र सरकारने लोकांची क्रयशक्ती वाढवणे आवश्यक. ज्या मुळे मागणीत वाढ होऊन औद्योगाक उत्पादन व रोजगारातही वाढ होईल. मंदीमुळे प्रभावत सर्वच सरकारांनी किन्स यांचा सल्ला मानल्याने ते मंदीतून बाहेर पडू शकले. सरकारने मनीसप्लाय म्हणजे चलन पुरवठ्यात वाढ करून व्याज दर कमी करणे हाही मंदीतून बाहेर पडण्याचा उपाय आहे. यामुळे ग्राहक कर्ज आणि उद्योगधंद्यांना मिळणारे कर्ज स्वस्त होऊन उपभोग आणि गुंतवणुक वाढते.
वर्तमान परिस्थितीत मंदी
सद्यस्थितीत सर्वच विकसीत देश मंदीच्या उंबरठ्यावर आहे. मंदीतून बाहेर पडण्यासाठी चलन पुरवठ्यात वाढ करून व्याजदर कमी करण्याचा सपाटा या देशांनी लावला. व्याजदर कमी असलेल्या देशातून व्याजदर अधिक असलेल्या देशात मोठ्या प्रमाणावर भांडवल जायला लागते. जसे जापानमध्ये व्याजदर भारतापेक्षा कमी आहे हे पाहून भारतीय उद्योगपती जापानकडून १ कोटींचे कर्ज घेतो. मात्र भारतात गुंतवणुकीसाठी त्याला येन विकून रूपये विकत घ्यावे लागतील. म्हणजे येन स्वस्त असतो. येनचे मूल्य तीन वर्षात ४० टक्के घटले आहे. यामुळे चीन आणि दक्षिण कोरीयाला निर्यातीत अडचणी होण्याची शक्यता लक्षात घेता हे देश चलनाची किंमत कमी करतील. अनेक देश १९३० ची भिकाऱ्याला निवड नसते आणी स्पर्धात्मक अवमुल्यन ची नीती वापरत आहेत.
वस्तुस्थिती - जेव्हाही खातेदारांचा विश्वास बॅंकांवरुन उडतो तेव्हा त्याला बॅंक रन, असे म्हटले जाते. यात बॅंकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता व १९३० च्या दशकात अमेरीकेत ९००० बॅंका बंद झाल्या. सध्या ग्रीस मध्येही बॅंकांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत.