आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यावर व्याज देणारी ठेव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तविक भारत हा सोने उत्पादन करणारा देश नाही. तरीही या देशातील नागरिकांच्या जवळ अन्य कोणत्याही देशातील नागरिकांच्या जवळ नसेल एवढे सोने आहे. पूर्वी जीवन विमा ही पद्धत नव्हती. अशी व्यवस्था नसल्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याचा संसार उघडयावर पडू नये म्हणून सोने हे त्या घरात एक गुंतवणूक म्हणून असायचेच. लग्नात पत्नीला पतीपासून बरेच सोने, दागिने वगैरे वाहण्याची पद्धती सर्वत्र आहे. याला कायद्यानुसार स्त्रीधन म्हणूनसुद्धा मान्यता आहे. म्हणजेच या धनावर त्या संबंधित स्त्रीचाच केवळ अधिकार असावयाचा. दुर्दैवाने पतीचे काही बरे वाईट झाल्यास अशा दुर्दैवी विधवेला सोन्याचाच मोठा आधार असायचा.

भारतात पडून असलेले सोने
भारत सोने की चिडीया है । असे जे म्हटले जाते याची जी अनेक कारणे आहेत, त्यापैकी महत्त्वाचे कारण असे की भारतात वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार २२००० ते २३००० टन सोने घरगुती व संस्थानमध्ये पडून आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखादे नाॅन पेईंग अॅसेट पडून असणे ही आर्थिक गतीमध्ये फार मोठा गतिरोध निर्माण करणारी अशी बाब होय.

>वास्तविक भारत हा सोने निर्मितीसाठी प्रसिद्ध नाही. भारतात आगदी तुरळक स्वरूपात सोन्याच्या खाणी आहेत. भारत सोने उत्पादक देश नसतानाही भारतात सोन्याचा एवढा मोठा साठा असण्याचे कारण की पूर्वी विदेशी विनिमयासाठी सोन्याचाच वापर केला जात असे. भारतीय कापड व रेशीम हे जगात जुने व उत्तम प्रतीचे असल्याचे सर्वत्र मान्य आहे. तसेच कला कुसरीच्या वस्तुही भारतातून फार मोठया प्रमाणात निर्यात होत असत. त्यामुळे या निर्यातीत वस्तुच्या बदल्यात सोन्याच्या किमतीत विनिमय मूल्य काढून तेवढे सोने भारतातील कारागिरांना मिळत असे व म्हणूनच सोने भारतात एवढया प्रमाणावर उपलब्ध आहे. या शिवाय सोन्याची मागणीही विपुल प्रमाणात असल्यामुळे दरवर्षी ८५० ते १००० टन सोने ज्याची किंमत साधारणत: ३५ ते ४५ बिलियन डाॅलर एवढी असू शकते. अर्थात २२०५०० कोटी रुपये ते २८३५०० कोटी रुपये अंदाजे होईल. म्हणजेच विदेशी विनिमय हे एक माध्यम व दुसरे आयात केलेले सोने अशा दुहेरी कारणांमुळे सोने भारतात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.

सोने आर्थिक क्षेत्रात येईल
सरकारने नुकतीच गोल्ड डिपाॅझीट स्किम घोषित केली आहे. या पद्धतीमध्ये कमीत कमी ३० ग्रॅम सोने हे बँकेमध्ये ठेवण्याची व्यवस्था आहे. ३० ग्रॅम पेक्षाही जास्त सोने या स्किममध्ये बँकेत ठेवल्या जाऊ शकते. असे सोने बँकेत ठेवल्यानंतर बँकेत गोल्ड सेव्हिंग अकाऊंट नावाचे खाते उघडले जाईल.
>सर्व प्रथम सोने धारकाला बँकेत सोने घेऊन जावे लागेल. तेथे हे सोने वितळविण्याल्या जाईल व त्याबाबतची पावती बंॅकेत सोने आणणा-याला दिली जाईल. याबाबत दोन पद्धती ग्राहकासाठी उपलब्ध आहेत. पहिल्या पद्धतीनुसार सोने ठेव स्वरूपात स्वीकारले जाईल. आणि त्यावर विशिष्ट अटींवर व्याज देण्यात येईल, असे व्याज नगदी स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात देण्याचीही व्यवस्था यात आहे. दुस-या पद्धतीत व्याज हे निश्चित स्वरूपाचे असून पहिल्या पद्धतीत व्याजाचा दर ठरविण्याचा अधिकार बँकेकडे असेल.

>या स्किममध्ये उद्देश अर्थ क्षेत्राला गतिमान करणे असा आहे. सोन्याला डेड इन्व्हेस्टमेंट असेही म्हटले जाते. या स्किममुळे सोन्याला मोबिलायझेबल इन्व्हेंस्टमेट अस म्हणता येईल. दुसरे असे की, कारागिरांना, सोनारांना तसेच मोठमोठया ज्वेलरी शॅप्सला बँकेत सोने विकत घेता येईल, अशी व्यवस्था पूर्वी नव्हती. या सर्वांना कर्ज रूपाने बँक सोने देईल. याशिवाय आज जे विदेशातून फार मोठया प्रमाणावर सोने आयात करावे लागते. अशी सोन्याची आयात फार माठया प्रमाणावर कमी होईल.
>ही योजना सोन्याचे आजचे दर कमी होण्यावर परिणाम करेल. म्हणजेच सोने भरपूर उपलब्ध असलब्ध असल्याने सोन्याचे भाव उतरतील असाही एक अंदाज आहे.
क्रमश: