आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Article Of R.Jagganathanon About Difficulties Regarding Cash Due To Demonetization

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठ्या नोटा छापल्या तरी मार्च २०१७ पर्यंत संपेल नगदीचे संकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या नगदीच्या कमतरतेला दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवस मागितले आहेत. मात्र, त्यांच्या ३० डिसेंबरच्या डेडलाइनमध्ये १५ दिवसांची चूक होऊ शकते. आता मात्र देशात आठ नोव्हेंबरच्या आधीसारखी सामान्य स्थिती केव्हा होईल, असे विचारल्यास त्याचे उत्तर असेल : ३१ मार्च २०१७ पर्यंत. कसे ते पाहूया...
प्रेसपासून बँका आणि एटीएमपर्यंत नगदी पैसे पोहोचवण्यासाठी तीन महत्त्वाच्या अडचणी येऊ शकतात- पहिली, नवीन नोटा छापण्याची क्षमता, दुसरी देशातील चार नोटांच्या प्रेसमध्ये छापण्यात आलेल्या नवीन नोटा बँकांपर्यंत पोहोचवणे. या प्रेस नाशिक (महाराष्ट्र), देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल), म्हैसूर (कर्नाटक) मध्ये आहेत. तिसरी अडचण म्हणजे नवीन नोटांच्या आकारानुसार सर्व एटीएममध्ये बदल करावा लागणार आहे. सध्या एटीएम ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन छोट्या आकाराचे पैसे माेजण्यासाठी सक्षम नाहीत.

यातील तिसरी अडचण दूर करणे सर्वात सोपे आहे. देशभरात २ लाखांपेक्षा जास्त एटीएम आहेत. यातील अर्ध्यापेक्षा जास्त एटीएममध्ये बदल करण्यात आलेले आहेत. १० डिसेंबरपर्यंत सर्व एटीएम नव्या नोटा देण्यायोग्य बनलेले असतील. याप्रमाणे एटीएममधून नोटा मिळण्याची समस्या दोन आठवड्यांत पूर्णपणे संपलेली असेल. वास्तविक एटीएममध्ये नगदी पैसे नसतील तर तीही एक वेगळीच समस्या आहेच. जर रिझर्व्ह बँकेच्या देशातील विविध भागांत असलेल्या सेंटरमध्ये पुरेसे पैसे असतील तरी, हा पैसा सुरक्षित व्हॅनच्या माध्यमातून एटीएम आणि बँकांच्या शाखेपर्यंत पोहोचवावा लागणार आहे. आधी एटीएममध्ये तीन ते चार दिवसांनंतर पैसे टाकण्यात येत होते. मात्र, आता नगदीची कमतरता असल्यामुळे एटीएम काही तासांतच रिकामे होत आहे. तेवढ्या गतीने एटीएममध्ये पैसे टाकणे शक्य नाही.

नाेटांची कमतरता दूर करण्यात सर्वात मोठी अडचण आपली नोटा छापण्याची क्षमता आहे. आपण लवकरात लवकर किती छोट्या नोटा छापू शकतो आणि त्याही कोणकोणत्या मूल्यांच्या यावर लोकांची अडचण कधी दूर होईल ते अवलंबून आहे. चारी नोटांचे कारखाने वर्षाकाठी २,४०० कोटी रुपयांच्या नोटा छापू शकतात. जर यामध्ये तीन शिफ्टमध्ये काम झाले तर, वर्षभरात ३,६०० कोटी रुपयांची छपाई होऊ शकते. म्हणजेच दर महिन्याला ३०० कोटी रुपये. जर मोठ्या चलनाच्या नोटा छापल्यास नगदीची समस्या लवकर दूर होऊ शकते. जर कमी मूल्यांच्या नोटा छापल्या तर, नगदीची समस्या बऱ्याच कालावधीपर्यंत राहू शकते. एक लाख रुपयांच्या नोटा छापण्यासाठी २००० रुपयांच्या ५० नोटा छापाव्या लागतील. तर एक लाख कोटी रुपयांच्या नोटा छापण्यासाठी ५० कोटी नोटा छापाव्या लागतील. आतापर्यंत सरकारने २,००० रुपयांच्या ३५० कोटी नोटा छापलेल्या आहेत. ज्या मूल्याच्या दृष्टीने सात लाख कोटी रुपयांच्या बरोबरीत आहे. ही ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांच्या रूपात जितक्या नोटा चलनातून बाहेर केल्या आहेत, त्याच्या बरोबर अर्धी रक्कम आहे.

सरकारने नोटाबंदीच्या माध्यमातून एकूण १४ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाहेर केल्या. या बरोबरीत नोटा छापण्याची आवश्यकता आहे. मात्र, १० ते १२ लाख कोटी रुपये मूल्याच्या छोट्या नोटा छापाव्या लागतील. येथे काळ्या पैशाच्या रूपात रक्कम बाहेरच येणार नाही असे मान्य केले. काही व्यवहार डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा पेटीएमसारख्या ई-वॉलेटवर शिफ्ट होऊ शकतात. याप्रमाणे नोटांच्या कारखान्यांनी १२ लाख कोटी रुपयांमधील सात लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा छापलेल्या आहेत. आता ५ लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा छापण्याचे काम बाकी आहे. यामध्ये ५०० रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या तर १००० कोटी नोटा छापण्याची आवश्यकता आहे. सर्व प्रेसचा पूर्ण क्षमतेने वापर केला तरी फेब्रुवारीपर्यंत वेळ लागू शकतो. ३ लाख कोटी रुपये मूल्याच्या ५०० रुपयांच्या नोटांची तत्काळ आवश्यकता आहे. त्यांची छपाई जानेवारीच्या मध्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. उर्वरित कमी मूल्याच्या नोटा छापण्यासाठी पाच महिने लागतील.

सरकारने आपले पूर्ण लक्ष १०० ऐवजी ५०० रुपयांच्या नोटा छापण्यावर केंद्रित केले तर नगदीची कमतरता जानेवारीपर्यंत दूर होऊ शकते. सर्व नोटांच्या कारखान्यांना आवश्यक नोटा छापण्यासाठी वर्षभर काम करावे लागणार आहे. मात्र, नगदीची कमतरता जानेवारी मध्य किंवा मार्च मध्यापर्यंत संपू शकते. ५०० आणि १०० रुपये मूल्याच्या नोटा कोणत्या प्रमाणात छापल्या जातात यावर सर्व अवलंबून आहे. एकंदरीत विचार केल्यास नगदीचे संकट लवकर नाही तर मार्च २०१७ पर्यंत संपेल.
आर. जगन्नाथन
rjagannathan@dbcorp.in
लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.
बातम्या आणखी आहेत...