आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठीणसमयी ‘संयम’ हाच गुंतवणूकदाराचा सांगाती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहाणासुरता मानला गेलेला तुमच्यातील गुंतवणूकदार आतापर्यंत पूर्णपणे गोंधळून गेला असेल. असे घडलेले नसल्याची शक्यता फारच कमी. विशेषत: भांडवल बाजाराची सध्याची तऱ्हा पाहता अनेकांची त्रेधातिरपीट होणे स्वाभाविकच. बाजारात निर्देशांक दोलकाच्या वर-खाली हेलकाव्यांनी गुंतवणूकदारांच्या हृदयाच्या ठोक्याशी ताल धरणे हे सद्य:स्थितीत अपरिहार्यच. नेमकी परिस्थिती काय आहे हे अशावेळी समजावून घेणे खूपच महत्त्वाचे. बाजारातील अस्थिरतेला कारणीभूत प्रमुख घटक असे-
विकसनशील बाजारातील भयकंप
विकसनशील अर्थव्यवस्था आणि जिनसांचे निर्माते असलेल्या देशांपुढील संकट हे आज बाजाराच्या अस्थिरतेचे मूळ व मुख्य केंद्र आहे. अनेक प्रमुख जिनसांच्या किमतीतील तीव्र स्वरूपाच्या उताराने हादरे निर्माण केले आणि परिणामी चीनच्या बाजारातील भूकंपाची कंपने जगभरच्या बाजारात उमटली. गेल्या एका वर्षात खनिज तेलाच्या किमती ६१ टक्क्यांनी गडगडल्या. परिणामी त्यामुळे ब्राझील, रशिया, अर्जेंटिना आणि ओपेकमधील तेल उत्पादक देशांच्या अर्थव्यवस्थाच डळमळीत झाल्या आहेत.
चीनमधील अर्थमंदी
जागतिक स्तरावरून मागणी घटली आणि चीनच्या निर्यात व आयातीला याचा जबर फटका बसला. गेल्या महिन्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार, चीनची निर्यात ही जवळपास ८ टक्क्यांनी डचमळली आहे, तर पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) सहा वर्षांपूर्वीच्या नीचांक पातळीवर गेला आहे. निर्यातप्रधान अर्थव्यवस्थेकडून देशांतर्गत मागणीला चालना देणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे चीनने अलीकडे प्रयत्नपूर्वक सुरू केलेले संक्रमणही फलदायी ठरलेले नाही. किंबहुना चीनला त्याच्या चलनाच्या बचावासाठी आपल्या ३.६ लाख कोटी डॉलरच्या महाकाय विदेशी चलन गंगाजळीला ४०० अब्ज डॉलरचे भगदाड पाडणे भाग पडले. चालू खात्यावर प्रचंड वरकड असलेल्या देशाबाबत हे असे घडणे विस्मयकारकच !
चलन अवमूल्यन
चीन आणि युरोझोन राष्ट्रांतील अर्थव्यवस्थांचे संथावलेपण हे जगभरात एकूणच तेल-धातूदींच्या घसरलेल्या किमती पाहता या जिनसांच्या निर्यातदार देशांच्या अर्थगतीबाबत प्रश्न निर्माण करणारे ठरले. चालू २०१६ वर्षात ब्राझील, रशिया, अर्जेंटिना आणि मलेशिया या देशांचे चलनांचे विनिमय मूल्य २० टक्क्यांहून अधिक गडगडले आहे. हे देश २००८ सारखीच बाजारात पडझड अनुभवत असून त्यांचे प्रमुख निर्देशांक हे वर्षातील उच्चांक पातळीपासून २५ टक्के व अधिक घसरले आहेत.
विदेशी गुंतवणुकीचे पलायन : तेल उत्पादक देशांकडे प्रचंड पैसा होता, जो जगभरातील रोखे व समभाग बाजारांतील तेजीचा इंधन पुरवत होता. परंतु सध्याच्या मलूल वातावरणापायी दिग्गज विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गेल्या वर्षभरात विकसनशील अर्थव्यवस्थांच्या बाजारातून तब्बल एक लाख कोटी डॉलरची गुंतवणूक काढून घेतली आहे.
अमेरिकेतील शेलचा फुफाटा
आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीतील तीव्र घसरणीला आणखी एक पैलू आहे. अमेरिकेतील शेल गॅस हा नवा इंधन स्रोत त्याला कारणीभूत आहे. अत्यंत खर्चिक अशा त्याच्या उत्पादन प्रक्रियेसाठी पैसा हा अमेरिकेच्या जंक बाँड्स (अत्यंत उच्च व्याजदराचे रोखे) बाजारपेठांकडून पुरवला गेला आहे. एका ढोबळ अंदाजानुसार शेल उत्पादक कंपन्या या रोखेधारकांना ३३० अब्ज डॉलर इतके देणे लागतात. आता अमेरिकेचे खनिज तेल- नायमेक्सही प्रतिबॅरल ४० डॉलरखाली गेले असल्याने त्याने अमेरिकेच्या या उच्च परताव्याच्या रोखेबाजारातही तणाव निर्माण केला. गेल्या ५ महिन्यांत रोख्यांच्या किमती १० टक्क्यांनी उतरल्या आहेत.
एकूणच अस्थिर वातावरणात कोणाही सुज्ञ व्यक्तीने आपल्या गुंतवणूकदार धोरणाचा फेरविचार करणे स्वाभाविकच आहे. वेळीच विक्री करून नफा गाठीशी बांधून घ्यायला हवा होता, अशी हळहळही मनात असेल. नाही, अजूनही वेळ गेलेली नाही, नुकसान करून घेण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर या गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचीही काहींची भावना असेल. जसे बाजाराचा पारा वर चढत असताना खरेदीची घाई केली जाते, अगदी त्याप्रमाणेच उद्याची वाट न पाहता विक्रीचा सपाटा मग सुरू होतो. सध्या आपला बाजार जगभरातून उडत येणाऱ्या माहितीच्या माऱ्याने हेलकावे घेताना दिसत आहे. बाजारातील या अस्थिरतेला एक अटळ अपरिहार्यता म्हणून आपण मान्यच केले पाहिजे. ठरावीक वर्षागणिक बाजारात हे असे अतर्क्य उल्हासाचे अथवा अगम्य जळफळाटाचे पडसाद उमटतच असतात. बाजारक्रमाचा त्यांना एक अभिन्न हिस्सा समजून आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवणे आपल्या हाती आहेच.
>खरे तर बाजारात ‘भय’ आणि ‘लोभ’ यादरम्यानचा जो अवकाश आहे तो अनेकांसाठी पैसा कमावण्याची संधी असते. या भावनेला काही लोक हे स्थितप्रज्ञता अथवा जडत्व, काहींच्या मते तो नशिबाचा खेळ असतो. पण नेमके विचाराल तर तो ‘धीर’, ‘संयम’ असा अजोड गुण आहे.
>हा गुण प्रत्येकात असतोच असे नाही. पण अशा अवघड स्थितीतच त्याची जोपासना होते. ते कसे शक्य आहे, या संबंधाने कोणते प्रश्न ध्यानात घ्यायला हवेत ते पाहू.
१.माझी गुंतवणूक ही दूरच्या व दीर्घकालीन विशिष्ट उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आहे, त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचलो आहोत काय? की आपल्यापाशी आणखी बराच कालावधी आहे?
२.मी ही गुंतवणूक माझ्या स्वकमाईतून केली आहे की त्यासाठी कुणाकडून उधार घेतली आहे?
३.माझी ही गुंतवणूक नियमित शिरस्त्याने म्हणजे एसआयपी धाटणीची आहे काय?
विकास सचदेवा
लेखक एडल्वाइझ अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे सीईओ आहेत.