आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगविश्वातील लढवय्ये म्हणून वाडियांची ख्याती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुस्ली वाडिया. यांना उद्योग जगतातील सामुराई असे संबोधले जाते. त्यांची या क्षेत्रातील सुरुवातच संघर्षाने झाली होती. ते सातत्याने उद्योग जगतातील स्पर्धात्मक वादात सामील होते. धीरूभाई अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजशी त्यांनी दीर्घ लढा दिला. ब्रिटानियासाठी त्यांनी संघर्ष केला. आता ते पुन्हा नव्या संघर्षासाठी चर्चेत आहेत. टाटा-मिस्त्री कुटुंबातील वाद यांच्यापर्यंत पोहोचला आहे. नुस्ली टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे वरिष्ठ स्वतंत्र निर्देशक आहेत. मात्र, कंपन्या वाडियांच्या नेतृत्वातून मुक्त होऊ इच्छितात. याचे मुख्य कारण म्हणजे वाडियांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सायरस मिस्त्रींचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला.

टाटा समूहाशी नुस्ली वाडियांचे संबंध १९७१ पासून आहेत. तेव्हा नुस्लींचे वडील नेविल वाडियांनी बॉम्बे डाइंग आर. पी. गोएंकांना विकण्याचा निर्णय घेतला होता. नुस्ली त्या वेळी शिक्षण पूर्ण करून बॉम्बे डाइंगमध्ये रुजू होण्यासाठी आले होते. त्यांना या करारासंबंधी कळले तेव्हा त्यांनी वडिलांना विरोध केला. जेआरडी टाटा तेव्हा वाडियांच्या समर्थनार्थ पुढे आले होते. त्या काळात त्याला पारसी विरुद्ध मारवाडी बिझनेस स्पर्धेचा रंग दिला गेला. बॉम्बे डाइंगच्या कर्मचाऱ्यांनी नुस्लीची साथ दिली. या आग्रहामुळे नेविल यांनी गोएंकांना सांगून बॉम्बे डाइंगचा सौदा रद्द केला. जेआरडी टाटांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद सोडले. त्या वेळी नव्या अध्यक्षपदासाठी वाडियांच्या नावावर गांभीर्याने विचार झाला. मात्र, वाडियांना पद नाकारले. रतन टाटांना अध्यक्ष करण्याचा सल्ला दिला. ७२ वर्षीय वाडिया माध्यमांपासून दूर राहणे पसंत करतात. क्वचित प्रसंगी ते माध्यमांसमोर येतात. एका मुलाखतीत ते म्हणाले की, परमेश्वराने मला माझ्या हक्कापेक्षा अधिक दिले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याची माझी महत्त्वाकांक्षा नाही.
बातम्या आणखी आहेत...