आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात आता करेक्शनची जास्त शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील शेअर बाजारांमध्ये सध्याच्या परिस्थितीत तरी खरेदी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये वाढ नोंदवण्यात आली. निफ्टी ११ महिन्यांच्या तेजीसह बंद झाला. अमेरिकेतील उत्साह वाढवणारे आकडे आणि जागतिक पातळीवर धोरण निर्मात्यांकडून आर्थिक प्रोत्साहन देण्याच्या आशेने बाजारात सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. १८ जुलैला संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यात वस्तु आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक मंजूर होण्याची शक्यता असून कंपन्यांचे तिमाही परिणाम चांगले येण्याची आशा असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सरकारी रोख्यांच्या खरेदीचेही योगदान या वेळी पाहायला मिळते. मंगळवारी घोषित होणाऱ्या किरकोळ महागाई दरात घट होईल, या अपेक्षेवर अनेक गुंतवणूकदार जोखीम उचलण्याच्या मानसिकतेत दिसले. शिवाय रिझर्व्ह बँकेच्या नवीन गव्हर्नरची घोषणा होईल, याचीही बरेच जण प्रतीक्षा करत होते.
एस अँड पी ५०० इंडेक्सने रेकॉर्डब्रेक उसळी घेऊन सोमवारी जागतिक स्तरावरील सर्व विक्रम तोडले. आर्थिक आकडे उत्तम राहण्यासह रोख्यांची विक्री कमी राहिल्यामुळे एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून यात वाढ होत होती. सोमवारी तो २,१३७.१६ अंकांसह विक्रमी वाढीसह बंद झाला. या अगोदरची विक्रमी वाढ २१ मे २०१५ मध्ये २,१३०.८२ एवढी होती.

दुसरीकडे जपानच्या निक्केई इंडेक्समध्येही वाढ नोंदवण्यात आली. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जपान सरकार राजकोशीय खर्चात १०० अब्ज डॉलरची भर घालू शकते, या आशेवरही तेथील शेअर बाजारात तेजी दिसून आली. केंद्रीय बँक नोटा छापून किंवा मिश्र धोरण बनवून व्यवस्था करू शकते. “हेलिकॉप्टर मनी’ असेही संबोधले जाते. “ब्रेक्झिट’च्या झटक्यातून सावरण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्या उत्तराधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आल्याने जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे. “ब्रेक्झिट’नंतर जगभरातील शेअर बाजारांत मोठी घसरण येण्याची शंका उपस्थित केली जात होती. परंतु क्रूड तेलाच्या घसरणीचा मुद्दा सोडला तर सध्या बाजारातील स्थिती चांगली दिसून येत आहे. स्थानिक शेअर बाजार मात्र सकारात्मक दिसून येत आहे. परंतु नफा वसुलीच्या दृष्टीने फार काही फायदा होईल, याची कमी शक्यता आहे. विशेषत: संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एक लहानशी दुरुस्ती होऊ शकते.

राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला निफ्टी मंगळवारी ८,५२१.०५ च्या पातळीवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर याचा स्तर ८,६२३ ते ८,६५९ याच्या दरम्यान असू शकतो. वास्तविक पाहता बाजारात आणखी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु सावधगिरी बाळगल्यास ते कधीही चांगले राहील. कारण खरेदी वाढणार असली तरी तांत्रिक दुरुस्ती होण्याची शक्यताही जास्त आहे. तरीसुद्धा ८,६२३ ते ८,६५९ यादरम्यान निफ्टीला पहिल्यांदा ८,५६० वर रेझिस्टन्स मिळू शकतो. हा मध्यम रेझिस्टन्स असेल.

घसरणीबद्दल बोलायचे झाल्यास निफ्टीला पहिला आधार ८,३९१ च्या जवळपास मिळेल. हासुद्धा एक उत्तम आधार राहील. तांत्रिक दुरुस्ती आली तर निफ्टी येथून परत येईल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जर घसरण मोठ्या प्रमाणात झाली तर ट्रेंड बदलण्याचा हा पहिला संकेत असेल. येथे घसरणीची अधिक शक्यता आहे. अशा परिस्थितीत निफ्टीला पुढील मध्यम आधार ८,३६१ च्या जवळपास मिळेल. यानंतरचा मजबूत आधार ८,२८६ वर मिळेल.
शेअर्सचा विचार केल्यास या आठवड्यात एल अँड टी आणि कोटक महिंद्रा बँक चार्टवर उत्तम स्थितीत दिसून येत आहेत. एल अँड टीचा सध्याचा बंद भाव १,५६८ रुपये आहे. तो १,५९७ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत याला १,५३२ रुपयांवर आधार मिळेल. तर कोटक महिंद्रा बँकेचा सध्याचा बंद भाव ७६३.६५ रुपये आहे. तो ७७६ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत याला ७५३ रुपयांवर आधार मिळण्याची जास्त शक्यता आहे.

- लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...