आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Weekly Economy Review By R.Jagannathan

राेजगार मिळाला तर थांबू शकतात शेतकरी अात्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृषिमंत्री राधामाेहन सिंह यांनी मागील अाठवड्यामध्ये शेतक-यांच्या अात्महत्यांच्या मुद्द्यावर भाष्य करून स्वत:लाच अडचणीत अाणले. त्यांनी सांगितले की, देशातील शेतक-यांच्या अात्महत्येच्या मागे घरगुती अडचणी, अाजारपण, अाम्लपदार्थांचे सेवन, हुंडा, प्रेमप्रसंग अाणि नपुंसकता हीदेखील प्रमुख कारणे अाहेत; परंतु देशभरातील प्रसार माध्यमांनी या मुद्द्यांना शेतक-यांवरील कर्जाचा भार अाणि कमी कमाई हाेण्यासारख्या गंभीर मुद्द्यांपासून लाेकांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न हाेत असल्याचे दाखवले.

वास्तविक कृषिमंत्र्यांनी हे विधान मागील अाठवड्यामध्ये राज्यसभेत केले; पण त्यानमित्ताने शेतक-यांच्या अात्महत्यांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा छेडली गेली. सरकार विविध तर्कांची पुष्टी करण्यासाठी अाकड्यांचा खेळ करत अाहे. नॅशनल क्राइम रेकाॅर्ड््स ब्युराेच्या (एनसीअारबी) २०१४ वर्षातील अाकडेवारीची किती तरी प्रकारे व्याख्या केली जाऊ शकते; परंतु ताजे अाकडे अापल्याला हेही सांगतात की, शेतीशी निगडित समस्या अाणि अन्य कारणांमुळे हाेणा-या अात्महत्यांचे अाकडे वेगळे करण्याचा एक गंभीर प्रयत्न हाेत अाहे, ही एक चांगली गाेष्ट अाहे.
वर्ष २०१४ च्या दरम्यान देशात एकूण ५,६५० शेतक-यांनी अात्महत्या केल्या, यामध्ये बहुतांश शेतक-यांच्या अात्महत्या (५८ टक्के) या शेतीशी निगडित अार्थिक चणचणीशी निगडित नाहीत. २२.३ टक्के शेतक-यांनी काैटुंबिक अडचणींमुळे, १४.६ टक्के शेतक-यांनी अाजारपणामुळे अाणि १६.३ टक्के शेतक-यांनी अन्य कारणांंमुळे अात्महत्या केल्या अाहेत. अापल्याला निसर्ग अाणि अन्य क्षेत्रांत गुंतवणूक वाढवण्याची गरज असल्याचे ही सर्व कारणे सांगतात. अात्महत्या करणा-या शेतक-यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी की, मरणा-यांमध्ये लहान शेतक-यांची संख्या जास्त अाहे. वर्ष २०१४ मध्ये अात्महत्या करणा-या गरीब तीनचतुर्थांश शेतकरी हे छाेटे किंवा अल्पभूधारक शेतकरी हाेते. त्यामध्ये ४४.५ टक्के लहान शेतकरी म्हणजे दाेन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेले हाेते. अल्पभूधारक शेतकरी किंवा एक हेक्टर शेतजमीन असलेले २७.९ टक्के हाेते. याचा अर्थ अल्पभूधारक शेतक-यांच्या अात्महत्यांचे मुख्य कारण अाहे, ही गाेष्ट स्पष्ट अाहे. अात्महत्या करणा-या ५,६०५ शेतक-यांमध्ये ४,०९५ शेतकरी हे अल्पभूधारक हाेते. अशा शेतक-यांना शेतीतून बाहेर काढण्यात अाणि त्यांना राेजगार मिळवून देण्यासाठी मदत करण्याची गरज अाहे. दुसरी गाेष्ट म्हणजे शेतक-यांनी अात्महत्या करण्याची समस्या ही काही राज्यांपुरती मर्यादित अाहे. देशभरातील एकूण ५,६५० अात्महत्यांपैकी २,५६८ शेतक-यांच्या अात्महत्या महाराष्ट्रात झाल्या अाहेत. त्याच्यानंतर तेलंगणा (८९८), मध्य प्रदेश (८२६) , छत्तीसगड (४४३) अाणि कर्नाटक (३२१) यांचा क्रमांक लागताे. याचा अर्थ ९० टक्के शेतक-यांच्या अात्महत्या याच राज्यांत झाल्या अाहेत. जर अार्थिक तंगीमुळे हाेणा-या अात्महत्या थांबवायच्या असतील तर या पाचही राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. कदाचित अन्य राज्यांमध्ये इतकी गंभीर परिस्थिती नसेल. त्यासाठी या ठिकाणी स्थानिक पातळीवरदेखील समस्या साेडवल्या जाऊ शकतात. तिसरा निष्कर्ष असा की, शेतक-यांच्या अात्महत्यांचे प्रमाण हे तुलनेने कमी अाहे. देशात मागील वर्षात एकूण १,३१,६६० अात्महत्या झाल्या. यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा पाच टक्क्यांपेक्षाही कमी अाहे. जर शेतक-यांच्या अात्महत्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अापण खराेखरच गंभीर असू तर एनसीअारबीच्या अाकडेवारीची सामाजिक, अार्थिक अाणि व्यक्तिगत जनगणना २०११ च्या अाकडेवारीबराेबर विश्लेषण करण्याची गरज अाहे. केवळ ३० टक्के ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नाचा माेठा हिस्सा शेतीमध्ये असून उर्वरित ७० टक्के कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्राेत मजुरी अाणि अन्य काम असल्याचे या जनगणनेच्या अाकडेवारीवरून दिसते. या विश्लेषणावरून एक गाेष्ट स्पष्ट हाेते की, शेतक-यांच्या अात्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त शेतक-यांनी अापली जमीन नफ्यामध्ये विकून कृषी क्षेत्रातून बाहेर पडावे अाणि लहान- माेठा व्यवसाय सुरू करावा किंवा मग दुस-या एखाद्या क्षेत्रात नाेकरी करावी.

अनेक शेतक-यांसाठी कृषी क्षेत्र व्यावहारिक नसणे ही खरी समस्या अाहे. काही जणांकडे लहान प्रमाणात जमीन अाहे, तर काही जणांकडे शेतीसाठी पुरेसा पैसा नाही; परंतु त्यांच्याकडे संपत्ती म्हणजे जमीन अाहे. जर त्यांना त्याची चांगली किंमत मिळाली तर ते जास्त उत्पादक कामात सहभागी हाेऊ शकतात अाणि शेतीच्या तुलनेत जास्त पैसा कमावू शकतात. अापले नेते शेतक-यांच्या अात्महत्यांच्या भावनिक मुद्द्यांचा वापर करीत अाहे जेणेकरून त्यांची कर्जे अाणखी माफ हाेतील, त्यांना जास्त अाधारभूत किंमत मिळेल अाणि त्यांना जास्त अनुदान मिळेल. पण गेल्या दहा वर्षांपासून अापण हेच करत अाहाेत अात्महत्या सुरु अाहेत. त्यामुळे अापल्यालाच पद्धत बदलावी लागेल.

rjagannathan@dbcorp.in
लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.