आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफ: करोडपती बनण्याचा मार्ग, जाणून घ्‍या कसा.....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकारने ईपीएफवरील कराचा प्रस्ताव मागे घेतला. त्यामुळे पगारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. भविष्य निर्वाह निधी हा कर्मचाऱ्यांसाठी जोखीमविरहीत व सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग मानला जातो. पीएफ खात्यावर सध्या ८.८ टक्के असे आकर्षक व्याज मिळते आहे. निवृतीनंतरच्या जीवनासाठी पीएफद्वारे चांगला पैसा मिळू शकतो....
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफवर कर लावण्याचा प्रस्ताव जाहीर केला होता. त्यानंतर त्यावर सर्व बाजूने टीका झाली. विशेषत: कर्मचारी संघटनांनी या करवाढीला प्रखर विरोध केला. त्यानंतर सरकारने ईपीएफवरील कराचा प्रस्ताव मागे घेतला. त्यामुळे पगारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे अलीकडेच नोकरीस लागलेले आहेत किंवा लागणार आहेत त्यांना याचा जास्त लाभ मिळणार आहे. ज्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी १५ हजार रुपये मूळ वेतनासह नोकरीस सुरुवात केली आहे. ती व्यक्ती ईपीएफमुळे निवृत्तीपर्यंत करोडपती होऊ शकते. ते कसे हे आता आपण पाहू.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, तरुणाईची १८ टक्क्यांपर्यंत बचत.... कोट्यधीश बनण्याचा मार्ग... ईपीएफ बचत फायद्याचा व्यवहार... सरकारचा प्रस्ताव नेमका काय होता... मध्यमवयीन कर्मचाऱ्यांचाही फायदा