आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजननंतर आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर स्वामींचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर निशाणा साधत आरोप केले आहेत. त्यांना पदावरून काढून टाकण्याची मागणीदेखील स्वामी यांनी केली आहे. मात्र, त्यांच्या या आरोपाला केंद्र सरकारने या वेळी उत्तर दिले असून मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर पूर्ण भरवसा असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. स्वामी यांच्या या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे आधीच भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही भाजपने स्पष्ट केले आहे.

स्वामी यांनी टिवट् करून अरिवंद सुब्रमण्यम यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे भाजपने स्वामी यांना स्पष्टीकरण देण्याची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर स्वामी यांनी राजनाथ यांची भेट घेतली. स्वामी यांनी याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे राजन यांनी पुन्हा या पदावर नियुक्ती नको असल्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. भाजपच्या वतीने पक्षाचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी स्वामी यांचे हे खासगी मत असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान या स्वामी यांचा खरा निशाना अर्थमंत्री अरुण जेटली असल्याचे मत काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केले आहे.

गव्हर्नरपदाची चर्चा
भारतीय रिर्झव्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्तीसाठी अरविंद यांच्या नावाची चर्चा सुरू असताना स्वामी यांनी त्यांच्यावर आरोप करणे सुरू केले आहे. स्वामी यांच्या मते, आमच्या गटातील विरोधकांना ओळखण्यासाठी मी जेटली यांची मदत करत आहे. अरविंद हे आयएमएफचे माजी अर्थतज्ज्ञ असून मोदी सरकारने ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.
बातम्या आणखी आहेत...