आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीश यांनी जीएसटीचे समर्थन करावे : अरुण जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बिहारचेमुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)चे समर्थन करावे, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. जीएसटीवर काही सूचना असल्यास त्याचे आम्ही स्वागत करू, असेही त्यांनी सांगितले.

जीएसटी दर जेवढा कमी असेल, तेवढा चांगला असल्याचे मतही त्यांनी या दराविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. एका बिझनेस वृत्त वाहिनीवर झालेल्या चर्चेत त्यांनी ही माहिती दिली आहे.

बिहार हे ग्राहकीच्या दृष्टीने महत्त्वाचे राज्य असून जीएसटीमुळे बिहारला फायदा होणार असल्याचे मत जेटली यांनी व्यक्त केले. जनता दलाने (यू) लोकसभेत आधीच जीएसटीचे समर्थन केले आहे. नितीश कुमार हे एक जबाबदार नेते असून त्यांनी विकासाच्या नावानेच विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांना जास्त पैशाची गरज असेल, यामुळे त्यांनी जीएसटीच्या संविधान संशोधन विधेयकाचे समर्थन करावे, असेही ते म्हणाले.

जीएसटीला समर्थन देण्यासाठी नितीश यांच्या सोबत बोलणी कराल का, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, आता नितीश काँग्रेसच्या सोबत आहेत, या एकाच कारणामुळे त्यांचे मत बदलतील असे मला वाटत नाही. जर असे झाले तर मी त्यांच्याशी चर्चा करेल. मात्र, एक जबाबदार नेते असल्यामुळे ते असे करतील असे मला वाटत नाही. केंद्र सरकारला एक एप्रिल २०१६ पासून जीएसटी लागू करायचे आहे. मात्र, जीएसटी बिल संविधान संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर झाले असले तरी राज्यसभेत अटकलेले आहे. वरिष्ठ सभागृहात सत्ताधारी एनडीए अल्पमतात आहे. जीएसटी लागू झाल्यावर एक्साइज, सेवा कर, विक्री कर, जकात सारखे अनेक कर रद्द होणार आहेत.

बिहारच्या विकासाला मदत :नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहार विकास करत असेल तर आम्ही बिहारच्या विकासासाठी नक्कीच मदत करू, असेही जेटली यांनी सांगितले. आधीच बिहारसाठी पॅकेजची घोषणा केली होती.