आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jaitley To Start Meetings For Budget Blueprint From 4th Jan

अर्थसंकल्पाआधी चार जानेवारीपासून जेटली करतील चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली पुढील आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाआधी चार जानेवारीपासून उद्योजक, कामगार संघटना आणि अर्थतज्ज्ञांशी चर्चा सुरू करणार आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेटली पुढील वर्षासाठीचा तसेच त्यांचा दुसरा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी करत आहेत. याच संदर्भात चार जानेवारी राेजी ते कृषी क्षेत्र तसेच कामगार क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. यानंतर सहा जानेवारी रोजी अर्थतज्ज्ञ आणि उद्योग जगतातील प्रतिनिधींसोबत बैठक होणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आयटी क्षेत्रातील प्रतिनिधींना जेटली भेटणार आहेत. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ११ जानेवारी रोजी जेटली बाजार तसेच अर्थविषयक नियामक प्राधिकरण तसेच संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. १२ जानेवारीला सामाजिक, बँक आणि अर्थविषयक प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत.