आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीपीएफवरील ८.१ टक्के व्याजही आकर्षक, इतर देशांत एवढे व्याज नाही : जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अल्पबचत योजनांवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय योग्य असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर कमी व्याजदर हा त्यावरचा एक चांगला उपाय अाहे, पीपीएफवरील ८.१ टक्के व्याजही आकर्षक असल्याचे जेटली म्हणाले. जगातील इतर कोणत्याही देशात एवढे व्याज मिळत नाही, हे व्याज करमुक्त आहे, त्यामुळे वास्तवात हा परतावा ११ ते १२ टक्क्यांपर्यंत जातो, याकडेही जेटली यांनी या वेळी लक्ष वेधले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जेटलींनी वार्ताहरांशी संवाद साधला. ते म्हणाले, व्याजदरातील कपात समीकरणावर आधारित आहे. हे समीकरण यूपीए सरकारनेच स्वीकारलेले आहे. त्या वेळी सरकारी रोख्यांवर व्याजदर जास्त होते, त्यामुळे या योजनांवरही जास्त व्याज होते. हे समीकरण दीर्घकाळापासून आहे, हे आम्ही बनवलेले नाही. बाजार व्याजदर निश्चित करते आणि सरकार त्या दराने त्यावर अनुदान देते. आम्ही पीपीएफवर हे अनुदान देतो.
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांवर हे थोडे जास्त असते. कर्ज स्वस्त होत आहे आणि ठेवींवरही जास्त व्याज मिळते आहे, असे होत नाही. या दोघांचाही परस्पर संबंध आहे.
बँकांची नजर रिझर्व्ह बँकेकडे
राष्ट्रीय बचत योजनांवरील व्याजदर कमी झाल्याने ठेवी व कर्जावरील व्याज तत्काळ घटवण्यात बँकांना रस नाही. बँक ऑफ महाराष्ट्रचे सीएमडी सुशील मुहनोत यांनी सांगितले, सरकारच्या या पावलानंतर बँकांकडून व्याजदरातील घटीची शक्यता आहे. मात्र, बहुतेक बँका रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याच्या प्रतीक्षेत आहेत. जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात १.२५ टक्के कपात केली आहे. मात्र बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात सरासरी ०.७ टक्केच कपात केली आहे.
बातम्या आणखी आहेत...