आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची मक्तेदारी मोडीत, औरंगाबादचा उद्योजक बनला नेदरलँडचा निर्यातदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घोड्यांच्या शर्यतीत अडथळे म्हणून वापरले जाणारे साहित्य बनवण्यात चीनची मक्तेदारी होती, परंतु ती मोडीत काढत औरंगाबादच्या लघुउद्याेजकाने नेदरलँडची आॅर्डर मिळवली आणि अवघ्या २७ दिवसांतच हे साहित्य तयार करून पाठवले देखील.

बजाज आॅटोत १७ वर्षे काम केल्यानंतर स्वत:ची कंपनी काढणाऱ्या तुकाराम पोतले यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. नगर जिल्ह्यातील पोतले अत्यंत गरिबीतून आले आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी बजाज कंपनीत नोकरीला लागले. वयाच्या ३५ व्या वर्षी नोकरी स ोडून
व्हिजन टेक्नाॅलाॅजी नावाने युनिट सुरू केले. चार मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या उद्योगातून इतर तिघे स्वतंत्र झाले. पुढे पोतले यांनी कृपा टेक्नाॅलाॅजी नावाने आॅटो पार्ट््स तयार करणे सुरू केले. वाळूजच्या बी सेक्टरमधील या युनिटमधून ते बजाज आॅटोला छोटे भाग करून देऊ लागले.

जुन्या साहेबांनी दिला ब्रेक :
सध्या एक्स्पर्ट ग्लोबल कंपनीत असलेल्या ओंकारनाथ गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखालीच पोतले बजाज कंपनीत काम करत होते. नेदरलँडची आॅर्डर मिळवून देण्यात गोडबोले यांनीच पोतलेंना मदत केली. उत्पादनाचे डिझाइनही करून दिले होते.

स्वस्तात अाणि कमी वेळात उत्पादन
नेदरलँडसह युरोपात रेसकोर्सचे प्रमाण जास्त आहे. शहराशहरांत हा अडथळ्यांच्या शर्यतीचा खेळ होतो. कोर्सवर लागणारे वर्ल्डक्लास हर्डल्स चीनमधून आयात केले जात होते. भारतात ही उत्पादने तयार होण्याचा शोध युरोपातील कंपन्या घेत होत्या. यासाठी त्या औरंगाबादेत आल्या. येथे स्वस्तात आणि कमी वेळेत उत्पादन मिळण्याची हमी मिळाली. पोतले यांच्या कंपनीने अवघ्या २७ दिवसांतच अॅल्यूमिनिअम हर्डल्सचे १०७ पीस नेदरलँडला पाठवले.
बातम्या आणखी आहेत...