आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automation Reduces Hiring Of TCS, Infosys, Wipro, HCL And Cognizant By 24%

ऑटोमेशनमुळे आयटीमधील रोजगार घटला, इन्फोसिसनेच केली जास्त भरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऑटोमेशन तंत्रज्ञानाद्वारे आयटी कंपन्या खर्च कमी करत असल्या तरी यामुळे या क्षेत्रात नोकरी करण्यास इच्छुकांना फटका बसत आहे. देशातील टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि कॉग्निजेंट या ५ मोठ्या आयटी कंपन्यांनी ऑटोमेशनमुळे मागच्या वर्षी २४ टक्के कमी नोकरभरती केली आहे. २०१५ मध्ये त्यांनी ७७ हजार २६५ लोकांनाच रोजगार दिला. सेंट्रम ब्रोकिंग या ब्रोकरेज कंपनीने याबाबतचा अहवाल जारी केला आहे. विशेष म्हणजे २०१८ पर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याचाही यात उल्लेख आहे. ऑटामेशनचा सर्वाधिक फटका कॉग्निजेंट टेक्नालॉजीवर झाल्याचे दिसते. चेन्नईत मुख्यालय असलेल्या या कंपनीने मागच्या वर्षी ७४.६ टक्के कमी रोजगार दिला. अहवालानुसार, वाढत्या स्पर्धेमुळे सर्व सॉफ्टवेअर कंपन्या ऑटोमेशनकडे वळल्या आहेत. या कंपन्यांपैकी एकमेव इन्फोसिसने २०१५ मध्ये २०१४ पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला. मागच्या वर्षी त्यांनी २३ हजार ७४५ लोकांना नोकरी दिली. २०१४ तुलनेत हे प्रमाण १११.४ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र, त्यापूर्वी इन्फोसिसमधून अनेक जणांनी राजीनामा दिला.

७४.६ टक्के कमी रोजगार दिला कॉग्निजेंटने
६.६ टक्के कमी संधी मिळाल्या टीसीएसमध्ये
१११. ४ टक्के अधिक नोकऱ्या
दिल्या इन्फोसिसने
दरडोई कर्मचारी व्यवसाय
टीसीएस २४ लाख रु.
इन्फोसिस २७ लाख रु.
विप्रो २६ लाख रु.
एचसीएल १७ लाख रु.
कॉग्निजेंट ३७ लाख रु.
आयबीएम १.४७ कोटी रु.
अाकडेवारी अंदाजे

दरडोई महसूल वाढवण्याचे लक्ष्य
आयटी कंपन्यांची क्षमता दरडोई कर्मचारी महसुलीवरून ठरवली जाते. या कंपन्यांचा प्रत्येक कर्मचाऱ्यामागे ४५ ते ५० हजार डॉलरपर्यंत महसूल असतो. सप्टेंबर २०१५ च्या ितमाहीत अमेरिकेच्या आयबीएम या कंपनीचा दरडोई कर्मचारी महसूल २ लाख १९ हजार २७० डॉलर होता. दरम्यान, २०२० पर्यंत आपण हे महसूल ८० हजार डॉलरपर्यंत नेऊ असा इन्फोसिसचा दावा आहे.