आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Bandhan Bank Is Born: Chandra Shekhar Ghosh's Incredible Journey From A Sweet Shop To Owning A Bank

चंद्रशेखर घोष यांचे पूर्वी मिठाईचे दुकान, आता करणार बँकेचा कारभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- देशात १२ वर्षांनंतर नवी बँक येत आहे. बंधन बँक. २३ आॅगस्टपासून कामकाज सुरू होईल. चंद्रशेखर घोष त्याचे प्रमुख आहेत. त्रिपुरात जन्मलेल्या घोष यांचे बालपण पूर्व पाकिस्तानात गेले. १९७१ मध्ये मुक्तिलढ्याच्या काळात लाखो लोकांप्रमाणेच चंद्रशेखर यांचे वडील हरिप्रदा घोष कंगाल झाले होते.

हाती उरले होते मिठाई बनवण्याचे कसब व सात मुलांची जबाबदारी. नवनिर्मित बांगलादेशात हे कसब कोण विचारणार? कुटुंबकबिल्यासह ते कोलकात्यात आले. निर्वासित म्हणून नवी ओळख मिळाली. हरिप्रदा यांनी मिठाईचे दुकान सुरू केले. ११ वर्षांचे चंद्रशेखर वडिलांसोबत दुकानात जायचे. शिक्षण सुरूच होते. एम.ए. करायला चंद्रशेखर ढाक्याला गेले. १९८४ मध्ये एका एनजीओत फील्ड आॅफिसर झाले. बांगलादेशात सर्वात गरीब असलेल्या भागात ते काम करत. १३ वर्षांनी कोलकात्याला परत आले. त्याच मिठाईच्या दुकानात. पण मन रमले नाही. पुन्हा एनजीओ. आता कोलकात्यातच. तीन वर्षे काही संस्थांत काम केल्यावर २००१ मध्ये स्वत: काही तरी करण्याचे ठरवले. पैसा मात्र जवळ नव्हता. बँकांनीही नकार दिला. महिना ७.५ टक्के व्याजाने १.७५ लाख रुपये सावकारी कर्ज काढले. २५ हजार बहिणीने दिले. दोन कर्मचारी घेऊन फायनान्सचे काम सुरू झाले. संस्थेचे नाव ठेवले ‘बंधन’. गरीब महिलांना पैसे देत होते. २००९ मध्ये बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून बंधनची नोंदणी केली. आता रिलायन्स, बिर्ला, बजाजसारख्या २५ बड्या समूहांना मागे टाकत बँकेचे लायसन्स मिळवले. २३ आॅगस्टपासून बंधन बँकेचा कारभार सुरू होईल.

बंधनच्या ४०० शाखा खेड्यांत, २०० शहरांत
>बंधनमध्ये सध्या १३ हजार लोक काम करतात. यात ६० टक्के १२वी पास, तर उरलेले पदवीधर.
> एकेकाळी बंधनमध्ये काम करण्यासाठी साधा कागद वाटून अर्ज मागवले जात होते.
>सध्या बंधनचे ६० लाख ग्राहक आहेत. बंधन बँक आता ११ हजार कोटींची खाती व ३२०० कोटींच्या भांडवलासह बाजारात उतरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...