आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीकरिता महाराष्ट्र बँकेची विशेष योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने विशेष योजना जाहीर केली. त्यात व्याज तर पूर्ण माफ होईलच, शिवाय कर्जाचा कालावधी पाहून मुद्दलातही १० ते ५५ टक्के सवलत मिळेल. या योजनेचे नाव ‘महाबँक राहत योजना’ आहे, अशी योजना जाहीर करणारी महाराष्ट्र बँक ही पहिली बँक असल्याची माहिती क्षेत्रीय प्रबंधक सुधीर कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ही योजना सवलतीची व एकरकमी कर्जफेडीची आहे. तिचा लाभ गैरकृषी कर्जदारही घेऊन शकतील. या योजनेंतर्गत २५ लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या कर्जदारांना परतफेडीत विशेष सवलत देण्यात आली आहे. थकीत कर्जदारांना त्यांच्या ३१ जुलै २०१६ पर्यंत शिल्लक मुद्दल व प्रतवारीनुसार ४५ ते ९० टक्के रक्कम घेऊन कर्जखाते बंद करण्यात येणार आहे. बँक व्याज पूर्ण माफ करणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त होण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.
ही योजना डिसेंबरपर्यंतच
ही योजना ३१ डिसेंबरपर्यंतच सुरू राहणार आहे. संबंधित खातेदाराने आधी काही रक्कम भरून तिच्यात सहभाग घेतला व डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे दिले, तरी चालणार आहे. जुन्या व थकलेल्या कर्जातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, या उद्देशाने बँकेने ही योजना आणल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...