आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीसमध्ये २१ दिवसांनंतर बँका सुरू, ज्येष्ठांच्या रांगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅथेन्स- ग्रीसच्या बँका सोमवारी उघडण्यात आल्या. आर्थिक स्थिती घसरल्यामुळे २९ जूनपासून बँका बंद होत्या. बँका सुरू झाल्यानंतर पैसे काढण्यासाठी विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची झुंबड उडाली होती. डिसेंबर-जूनदरम्यान बँकांतून ४० अब्ज यूरो(सुमारे २.८ लाख कोटी रु.) काढले. सरते शेवटी बँक बंद करण्याची नामुष्की ओढवली. यामुळे साधारण २१ हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. यूरोझोनच्या देशांसोबत कर्जासंबंधी करार झाल्यानंतर सर्व बँका पुन्हा सुरू करण्यात आल्या.
- ग्रीस बँक असोसिएशनचे प्रमुख लुका कात्सेली यांनी लोकांना पैसे बँकेत राहू देण्याचे आवाहन केले आहे.
- शेअर बाजार २१ दिवसांपासून बंद आहे. सरकारने बाजार सुरू करण्याबाबत कोणतीही माहिती जाहीर केली नाही.
- सोमवारपासून व्हॅट वाढवण्यात आला. खाद्यपदार्थ, रेल्वे-बस प्रवासावर व्हॅट १३ ते २३ टक्के केला आहे.
- ईयूने ग्रीसला ५० हजार कोटी दिले. बँकेचे २९,५०० कोटी, आयएमएमला १४,५०० कोटी कर्ज फेडावे लागेल.
पंतप्रधानांची आई म्हणाली, मुलाला जेवायलाही वेळ नाही
"अॅलेक्सीसच्या विचाराने मला तीन दिवस झोप आली नाही. माझा मुलगा आपल्या खांद्यावर देशाचे ओझे वाहत आहे. त्याला जेवायला व झोपायलाही वेळ नाही. - एरिस्टी सिप्रास
बातम्या आणखी आहेत...