आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत खात्यात तिमाही व्याज जमा करावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोट्यवधी बचत खातेधारकांच्या हिताचा विचार करत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने बचत खात्यात प्रत्येक तीन महिन्यांत किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत व्याज जमा करण्याचे बँकांना निर्देश दिले आहेत. सध्याच्या स्थितीत बँकांच्या वतीने दर सहा महिन्यांनी बचत खातेधारकांना व्याज देण्यात येते. वास्तविक एक एप्रिल २०१० पासून बँकेच्या वतीने दररोजप्रमाणे व्याजदर निश्चित केले जाते.

देशांतर्गत बचत खात्यातील जमा रकमेवर प्रत्येक तीन महिन्यांत किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत व्याज जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, असे िनर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात बँकांना देण्यात आले आहेत. सार्वजनिक बँकांच्या वतीने बचत खातेधारकाला चार टक्के दराने व्याज दिले जाते तर खासगी क्षेत्रातील बँका सहा टक्के दराने व्याजदर देतात. २०११ मध्ये केंद्रीय बँकेने बँकांना आपल्या मनाने व्याजदर ठरवण्याची मुभा देण्यात आली होती. बचतीवरील व्याजदराबाबत त्यानंतर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. एक लाख रुपयांपेक्षा कमी जमा असल्यास एक सारखे व्याजदर ठेवण्यात यावे, असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले होते, तर त्यापेक्षा जास्त जमा रकमेवर किती व्याजदर द्यावे याचा निर्णय बँकांनी घ्यावा, असे मतही त्या वेळी व्यक्त करण्यात आले होते.

ग्राहकांचा फायदा
कमी कालावधीसाठी पैसे बचत खात्यात ठेवल्यास ग्राहकांना त्याचा जास्त फायदा होईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बँकांना ग्राहकाला जास्त व्याज द्यावे लागणार आहे. कमी कालावधीत ग्राहकांना व्याज द्यावे लागल्यास बँकांवर ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या आधी बँका बचत खात्यावर ३.५ टक्के व्याज देत होत्या. व्याजदर प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपासून महिन्याच्या शेवटपर्यंत ज्या दिवशी सर्वात कमी जमा असेल त्या रकमेवर व्याज दिले जात होते.
बातम्या आणखी आहेत...