आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुलैमध्ये 10 दिवस बँका बंद राहणार; व्हॉट्सअॅपवरील मेसेजेसमुळे ग्राहक संभ्रमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बॅंकेची संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर तर आजच आटोपून घ्या, जुलै महिन्यात बँका तब्बल 10 दिवस बंद राहणार आहेत. त्यापैकी रमजान ईदच्या सार्वजनिक सुटीसह दाेन शनिवार अाणि पाच रविवार, कर्मचारी संपाचे दाेन दिवस यांचा समावेश असेल.

स्टेट बँक अाॅफ इंडियाच्या सहयाेगी पाच बँकांच्या विलीनीकरणाचा निषेध म्हणून एक दिवस या बँकांतील कर्मचारी संपावर जाणार अाहेत, तर दुसऱ्या दिवशी सगळ्या बँकांतील अधिकारी व कर्मचारी संपावर जाणार अाहेत.

बारा दिवस बँका बंद राहणार असल्याचे मेसेजेस व्हॉट्सअॅपवर फिरत असून ग्राहकांची माेठी अडचण हाेणार असल्याचे सांगितले जात अाहे. मात्र, प्रत्यक्षात बारा नाही तर दहा दिवस बँका बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले अाहे.

तीन जुलैचा रविवार, 6 जुलैची रमजान ईदची सुटी, 9 जुलैला पहिला शनिवार, 10 जुलैला रविवारची, तर 12 जुलैला स्टेट बँकेच्या सहयाेगी बँकांच्या कर्मचाऱ्यांचा संप, 13 जुलैला इतर बँकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा संप, 17 जुलैचा रविवार, 23 जुलैला चाैथ्या शनिवारची अाणि 24 अाणि 31 जुलैला रविवारची अशा दहा दिवस सुट्या बँकांना असतील. दरम्यान, महिन्याच्या दुसऱ्या अाणि तिसऱ्या अाठवड्यात केवळ चार दिवस बँकांचे कामकाज चालणार अाहे. चाैथ्या अाणि पाचव्या अाठवड्यात पाच दिवस कामकाज सुरू असेल.

स्टेट बँक अाॅफ इंडियात ज्या पाच सहयाेगी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात अाला अाहे त्यातील कर्मचारी 12 जुलैला संपावर असतील. या दिवशी इतर बँका मात्र सुरू राहतील.

दाेन दिवस अालटून पालटून संप
रविवार, शनिवार बँकांना सुटी अाहे. रमजान ईदची सुटी असेल. एक दिवस स्टेट बँकेच्या सहयाेगी बँकांतील कर्मचाऱ्यांचा, तर एक दिवस इतर बँक कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा म्हणून लाक्षणिक संप अाहे.
- गिरीश जहागीरदार, प्रदेश उपाध्यक्ष, अाॅल इंडिया बँक अाॅफिसर्स असाेसिएशन
बातम्या आणखी आहेत...