आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँका मल्ल्यांकडून कर्जाची पै न् पै वसूल करतील : अरुण जेटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मल्ल्यांना कर्जस्वरूपात दिलेली पै न् पै बँका वसूल करतील, असा इशारा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी दिला. याशिवाय तपास संस्था मल्ल्यांच्या बेकायदेशीर कामांविरुद्ध कठोर कारवाई करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विविध बँकांनी मल्ल्यांकडील ९००० कोटी रुपयांच्या वसुलीबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यापूर्वी मल्ल्यांनी देशातून पलायन केले हाेते. ते सध्या ब्रिटनमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यांच्याबाबतची (मल्ल्या) वस्तुस्थिती स्पष्ट आहे. प्राप्तिकर विभाग किंवा तपास संस्था असो, त्यांनी जिथे जिथे कायद्याचे उल्लंघन केले असेल तिथे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. बँकाही कर्जाचा एक एक पैसा वसूल करतील, असे जेटली यांनी एका कार्यक्रमात सांगितले. मल्ल्या यांच्या वसुलीबाबत सरकार काय उपाययोजना करत आहे, या प्रश्नावर जेटली बोलत होते. पोलाद, वस्त्रोद्योग, महामार्ग आणि पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांतील समस्या सोडवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. वैयक्तिक प्रकरणांत मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्यामुळे नॉन परफॉर्मिंग अकाउंट्सची (एनपीए) समस्या मोठी आहे. अशी कर्जे देताना पुरेसे तारण घेतले जात नाही, ही चिंतेची बाब आहे, असे ते म्हणाले. मल्ल्या प्रकरणामुळे भारतीय बँकिंग तसेच खासगी क्षेत्रालाही कलंक लागला. यातून धडा न घेतल्यास भविष्य धोकादायक असेल, अशी भीती जेटली यांनी व्यक्त केली. सार्वजनिक क्षेत्रातील बँका बळकट राहतील, याकडे लक्ष देणे माझे कर्तव्य असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सीबीआयच्या एफआयआरचा आधार, ईडीकडून कारवाई.... मल्ल्या हाजिर हो...
बातम्या आणखी आहेत...