आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीच्या बायरने मोन्सँटोला घेतले विकत, ४.४ लाख कोटी रुपयांचा व्यवहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - जर्मनीची बायर कंपनी जगातील सर्वात मोठी बियाणे आणि कीटकनाशक कंपनी असलेल्या मोन्सँटोला विकत घेणार आहे. हा व्यवहार ६६ अब्ज डॉलर (४.४ लाख कोटी रुपये) मध्ये ठरला आहे. या वर्षीचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा व्यवहार आहे. हा पूर्ण पैसा नगदी दिला जाणार असल्यामुळे आतापर्यंतचा सर्वात मोठा नगदी व्यवहार ठरणार आहे. हे विलीनीकरण पुढील वर्षापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोणत्याही कंपनीने हा व्यवहार रद्द केल्यास त्या कंपनीला दोन अब्ज डॉलर (१३,४०० कोटी रुपये) द्यावे लागणार आहेत.

बायर कृषी उत्पादनासह आरोग्यविषयक रसायनांचादेखील व्यवसाय करते. स्विस कंपनी सिन्जेंटानंतर या कंपनीचा कृषी रसायनांचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. अमेरिकी कंपनी असलेल्या मोन्सँटो सर्वसामान्यपणे जेनेटिकली मॉडिफाइड (जीएम) बियाण्यांसाठी ओळखली जाते. ही कंपनी मका, सोयाबीन, कापूस आणि गव्हासारख्या पिकांची जीएम बियाणे विक्री करते. जगभरातील अनेक देशांमध्ये पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे या बियाण्यांना विरोध होत आहे.

या अधिग्रहणानंतर बायर कंपनीचा पोर्टफोलिओ पूर्णपणे बदलणार आहे. सध्याच्या स्थितीत आरोग्यसेवा हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. २०१५ मध्ये या कंपनीचा ७० टक्के बिझनेस हा हेल्थकेअर, तर ३० टक्के कृषीसंबंधित आहे. या अधिग्रहणानंतर दोन्हींची हिस्सेदारी ५०-५० टक्के होणार आहे. गेल्या वर्षी या कंपनीचा जागतिक व्यवसाय ३.४५ लाख कोटी रुपये, तर मोन्सँटोचा एक लाख कोटी रुपयांचा होता.

या अधिग्रहणानंतर जगातील बियाणे आणि कीटकनाशकांच्या २५ टक्के बाजारावर बायरचे वर्चस्व होणार असल्याने बायर-मोन्सँटोमधील या व्यवहाराला प्रतिस्पर्धा नियामकांच्या कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. या क्षेत्रातील इतर मोठ्या कंपन्या - डाऊ केमिकल, ड्यूपोंट आणि सिन्जेंटा यांनीदेखील विलीनीकरण आणि अधिग्रहणांची घोषणा केली आहे. मात्र, त्यांना आतापर्यंत नियामकाने मंजुरी दिलेली नाही. शेतकरी संघटनांनीदेखील अशा प्रकारच्या व्यवहाराचा विरोध केला आहे. कमी कंपन्या झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर जास्त पर्याय राहत नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. यामुळे कंपन्या उत्पादनाचे दरदेखील वाढवू शकतात.
या आधी मोन्सँटोने स्वित्झर्लंडच्या सिन्जेंटा कंपनीला खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्विस कंपनीने ही ऑफर नाकारली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच या कंपनीने चीनमधील केमचाइनामध्ये विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. तर अमेरिकी डाऊ केमिकल आणि ड्यूपांेटनेदेखील विलीनीकरणाची घोषणा केली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, आतापर्यंतचे र्वात मोठे व्यवहार
बातम्या आणखी आहेत...