आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशा अंबानीचे PHOTOSHOOT, पाहा काय-काय झाले BEHIND THE SCENES

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईशाचे हे फोटोशूट देशातील सर्वात महागडे घर असलेल्या अँटिलियामध्ये झाले. - Divya Marathi
ईशाचे हे फोटोशूट देशातील सर्वात महागडे घर असलेल्या अँटिलियामध्ये झाले.
मुंबई - देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींची मुलगी ईशाने नुकतेच रिलायन्सचे फॅशन पोर्टल 'एजीओ' लाँच केले आहे. या फॅशन ब्रँडची जबाबदारी ईशा स्वतःच सांभाळत असल्याचे सांगितले जात आहे. ईशाने मानसशास्त्रामध्ये शिक्षण पूर्ण केले असले तरी, तिला फॅशन क्षेत्राविषयी आवड आहे. फॅशन पोर्टल एजीओ लाँच करण्यापूर्वी तिने फेमिना मॅग्झिन 2015 साठी कव्हर फोटोशूटही केले आहे. मुकेश अंबानी यांनी उद्या 19 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत.

कुठे झाले फोटोशूट...
- ईशाचे हे फोटोशूट देशातील सर्वात महागडे घर असलेल्या अंबानी कुटुंबीयांच्या अँटिलियामध्ये झाले.
- या फोटोशूटमध्ये तिने जंपसूटपासून ते ऑफिशियल कॉर्पोरेट लूकमध्येही दिसून आली.
- बॉलीवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टर यांनी फोटोशूटसाठी तिचा मेकअप केला.
- या फोटोशूटशिवाय ईशा नुकतीच लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवरही अवतरली होती.
- 2012 मध्ये तिने मिझवान फॅशन शोमध्ये तिची आई नीता अंबानीसह रॅम्प वॉक केला होता.

कसे आहे फॅशन पोर्टल...
- रिलायन्स ग्रुपच्या फॅशन पोर्टलचे नाव ago.com असे आहे. त्याची जबाबदारी ईशा अंबानी सांभाळत आहे. सध्या या पोर्टलवर केवळ वुमेन्स वीअर आहेत.
- सुमारे 200 नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे प्रोडक्ट्स या पोर्टलवर आगामी काळात विक्री केले जाणार आहेत.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार पोर्टल लाँच करण्यापूर्वी त्याची पहिली ट्रायल रिलायंन्सच्या कर्मचाऱ्यांमध्ये घेण्यात आली. त्यांची आवड निवड लक्षात घेऊन हे पोर्टल तयार करण्यात आले.

डायरेक्टरच्या भूमिकेत..
- ईशा रिलायन्सच्या टेलिकॉम आणि रिटेल कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहे.
- रिलायंस रिटेल अंतर्गतच हे फॅशन पोर्टल लाँच करण्यात आले आहे.
- रिलायन्स जॉइन करण्यापूर्वी तिने अमेरिकेत ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म मॅकिंसेमध्ये काम केले आहे.
- ईशाने 2013 मध्ये येल युनिव्हर्सिटीमधून साइकॉलॉजी आणि साउथ एशियन स्टडीजमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
- 2008 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी ती प्रथम चर्चेत आली होती. फोर्ब्सच्या यादीत तिला सर्वात श्रीमंत वारसांच्या यादीत स्थान देण्यात आले होते.

विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष
अभ्यासाबरोबरच ईशाला क्रीडा क्षेत्राविषयीदेखिल आवड आहे. शालेय दिवसांमध्ये ती विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष आणि फुटबॉल टीमची सदस्य होती. त्याशिवाय ती एक ट्रेन्ड पियानो आर्टिस्टही आहे. यंग सेलिब्रिटी असूनही ती सिंपल आणि ग्लॅमरस आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ईशाचे BEHIND THE SCENE PHOTOSHOOT...
बातम्या आणखी आहेत...