आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल पेमेंट: आता कॅशविना करा बिग बाजारात खरेदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी द‍िल्ली- बिग बाजारात 'मोबाईल पेमेंट'ची योजना सुरू करण्‍यात आली आहे. या योजनेर्तंगत ग्राहकांना बिग बाजारात कॅशविना खरेदी करता येणार आहे. खरेदीसाठी ग्राहकाला फक्त आपला स्मार्टफोन सोबत ठेवावा लागणार आहे. बिग बाजारने ही योजना पहिल्या टप्प्यात दिल्लीसह मुंबईत सुरु केली आहे. आगामी काळात ही योजना देशभरात सुरू करण्‍यात येणार असल्याचे सूत्रांन‍ी सांगितले.
मोबाईल पेमेंटसाठी बिग बाजारने मोबाईल पेमेंट सर्व्हिससाठी 'मोबिक्वि‍क' या कंपनीशी करार केला आहे. बिग बाजारच्‍या फ्यूचर ग्रूपने मोबाईल पेमेंटची सुविधा आपल्या अन्य रिटेल स्‍टोअर्स होम टाउन व इलेक्‍ट्रॉनिक रिटेल चैनमध्‍येही सुरु केली जाणार असल्याचे म्हटले आहे.
मोबाईलने पेमेंट करण्‍याची प्रक्रिया
ग्राहकाला मोबाईलने पेमेंट करण्‍यासाठी बिग बाजारच्‍या कॅश काउंटरवर ग्राहकाला रजिस्‍टर्ड मोबाईल नंबर देऊन 'मोबिक्‍िवक वॉलेट'कडून कोड मिळवावा लागेल. नंतर मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड (ओटीपी ) येईल , त्‍याचा उपयोग ट्रान्झेक्‍शनसाठी केला जातो. ग्राहकाला हा ओटीपी पासवर्ड बिग बाजारच्‍या कॅश काउंटरवर एक्झिक्युटिव्‍हला दाखवून ते रिटेलर्स सिस्‍टममध्‍ये टाकावा लागतो.
डब्‍ल्‍यूएच सोबत करार
मोबाईल वॉलेट कंपनी 'मोबिक्विक'ने अशा प्रकारचा करार दुसर्‍यांदा केला आहे. यापूर्वी कंपनीने डब्‍ल्‍यूएस स्मिथसोबत ( एअरपोर्टस, मेट्रो स्‍टेश्‍ान व कॉफी कॅफे आउटलेट्‍स) करार केला होता. ही माहिती 'मोबिक्विक'च्‍या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.
'डब्‍ल्‍यूएस स्मिथ' वर मात्र, डिजिटल पेमेंट अद्याप सुरु झालेले नाही. बिग बाजारात सुरू झालेली ही सुविधा स्‍टारबॉक्‍सच्‍या मोबाईल अॅपसारखी आहे, ही सुविधा अमेरिकेत लोकप्रिय ठरली आहे. मोबाईल पेमेंटची सुविधा फक्त ई-कॉमर्स कंपण्‍यामध्ये सुरु होती.
बातम्या आणखी आहेत...