आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bill Gates Is Again The Richest Person On Earth With A Net Worth Of 87 Billion

झटपट अब्जाधीश व्हायचंय, मग, वाचा बिल गेट्स यांचे यशस्वी डझनभर फंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स बिल गेट्स यांच्याकडे पाहिल्यानंतर 'अनुभव', 'परिश्रम' आणि 'दृढनिश्चिय' या तीन शब्दांचा अर्थ कळतो, असे म्हटले जाते. बिल गेट्‍स यांना नुकतेच जगातील सर्वात धनाढ्य व्यक्तिचा बहुमान मिळाला आहे.

'वेल्थ-एक्स'ने जाहीर केलेल्या नव्या लिस्टमध्ये गेट्‍स यांना अव्वल स्थान देण्यात आले आहे. गेट्‍स यांच्याकडे एकूण 87.4 बिलियन डॉलर (जवळपास 5.9 लाख कोटी) मालमत्ता आहे. 'फोर्ब्स'ने देखील गेट्‍स यांचा हा बहुमान दिला आहे. गेल्या 21 वर्षांत गेट्‍स यांनी सोळा वेळा अव्वल स्थान पटकावले आहे.

एखाद्या यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचे पाठबळ असते. मा‍त्र, बिल गेट्स यांच्या यशामागे अनोखे 12 फंडे आहेत. हे 12 फंडे आत्मसात केल्यानंतर अब्जाधीश बनल्याचे गेट्‍स स्वत: सांगितात. बिल गेट्स यांनी काही तत्त्वे आत्मसात केली आहेत. गेट्‍स यांनी जीवनात कधीच त्यांच्याबाबतीत तडजोड केली नाही. म्हणूनच गेट्‍स आजही जगातील टॉप धनाढ्य लोकांमध्ये अव्वल आहेत.

जगाला बदलून टाका अन्यथा घरी बसा...
जीवन एक प्रवाह आहे. जगाला अधिक सुंदर करण्‍यासाठी काम करा. यासाठी शक्तीचा योग्य वापर करा. व्हर्जन, प्लॅटफॉर्म, सिस्टिम, आयडिया, रिझन अथवा इनोव्हेशन वापरून पाहा. व्यक्तिमध्ये जग बदलून टाकण्याची ताकद आहे. तोच स्वत:साठी काही करू शकतो.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, बिल गेट्स यांचे अन्य 11 फंडे...