आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birth Day Of Richest Group Of India Bajaj Group Chairman Rahul Bajaj

\'ड्रीम प्रोजेक्ट- हमारा बजाज\' बंद झाल्याने आजही दु:खी आहेत राहुल बजाज!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल बजाज - Divya Marathi
राहुल बजाज
मुंबई- बजाज ऑटो इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा आज वाढदिवस (10 जून, 1938) आहे. राहुल बजाज हे देशातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. परंतु, 'ड्रीम प्रोजेक्ट- हमारा बजाज' बंद झाल्याने राहुल बजाज आजही दु:खी आहेत.

मुलगा राजीव याने वडिलांच 'ड्रीम प्रोजेक्ट- बुलंद भारत की बुलंद तस्वीर... हमारा बजाज स्कूटर'चे उत्पादन बंद केल्याने राहुल बजाज यांना मोठा धक्का बसला आहे. ते आजही धक्क्यातून बाहेर निघू शकलेले नाहीत. मुलगा राजीव याच्या या निर्णयामागे कंपनीच्या भविष्यासाठी मोठा उद्देश आहे, हे देखील राहुल बजाज यांना माहीत आहे. परंतु, बजाज स्कूटरचे उत्पादन बंद झाल्याने आपण आजही दु:खी असल्याचे राहुल बजाज सांगतात.

राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज यांनी 1926 मध्ये बजाज समुहाची स्थापना केली होती. जमनालाल बजाज यांची दोन मुले होती. कमलनयन बजाज आणि रामकृष्ण बजाज. राहुल बजाज कमलनयन बजाज यांचे थोरले पुत्र आहेत. राहुल बजाज यांना दोन मुले (राजीव आणि संजीव) आणि एक मुलगी (सुनयना बजाज-केजरीवाल) आहे.

राहुल बजाज यांनी हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1965 मध्ये बजाज समुहाचा कारभार हाती घेतला. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने स्कूटर आणि मोटरसायकलचे उत्पादन सुरू केले. पाहता पाहता बजाज स्कूटर ही आधुनिक भारताची ओळख बनली. बजाज समुहाचा आज टर्न ओव्हर 50 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. देशाच्या औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल राहुल बजाज यांना 2001 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवले
भारतीय औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे राहुल बजाज यांना सरकारने अनेक महत्वपूर्ण पदांवर नियुक्त केले.
>1975-77 - डेव्हलपमेंट काउंसिल फॉर ऑटोमोबाइल्स आणि एलाइड इंडस्ट्रीचे चेअरमन
>1992- इंडो-जर्मन कन्सल्टेटिव्ह ग्रुपचे सदस्य
>1979-80 आणि 1999-2000 - बजाज सीआयआयचे अध्यक्ष
>जानेवारी 2001 मध्ये दाओस, स्विर्त्झंलडमध्ये आयोजित वर्ल्ड इकोनॉमिक फोरमचे अध्यक्ष

घोड्याच्या नावावरून ठेवले होते 'चेतक स्कूटर'चे नाव
1980 मध्ये बजाज आटो कंपनीने 'चेतक बजाज स्कूटर'चे उत्पादन सुरु केले. तेव्हा व्हेटिंग लिस्ट भली मोठी होती. राहुल बजान यांनी महाराणा प्रताप यांच्या घोड्याच्या नावावरून बजाज स्कूटरचे नाव 'चेतक'चे ठेवले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पिढीतील अंतर....