आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या पैशासंबंधित अहवाल संसदीय समितीला सोपवले; काळ्या पैशाची अधिकृत आकडेवारी कळेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-देशात आणि देशाबाहेरील भारतीयांकडे किती काळा पैसा आहे याची अधिकृत आकडेवारी अद्याप कुणालाच माहीत नाही, पण या मुद्द्यावर तयार करण्यात आलेले तीन अहवाल सरकारने संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीकडे पाठवले आहेत. समितीने त्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर हे अहवाल संसदेसमोर सादर केले जातील. त्यानंतर काळ्या पैशासंदर्भातील अधिकृत आकडेवारी बाहेर येऊ शकते. अधिकृत सूत्रांच्या मते, दिल्लीस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (एनआयपीएफपी), नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च  (एनसीएईआर) आणि फरिदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंटने  (एनआयएफएम) अभ्यास करून हे अहवाल तयार केले आहेत. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने या संस्थांवर ही जबाबदारी सोपवली होती. एनआयपीएफपीने ३० सप्टेंबर २०१३, एनसीएईआरने १८ जुुलै २०१४ आणि एनआयएफएमने २१ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांचा अहवाल जमा केला होता.
  
काळ्या पैशाबाबत कोणतीही विश्वसनीय आकडेवारी नसल्याने अर्थ मंत्रालयाने या संस्थांना या अभ्यासासाठी २०११ मध्ये आदेश जारी केले होते. सध्या उपलब्ध आकडेवारी ही अंदाजावर आधारित असून ती अधिकृत नाही. बेहिशेबी मालमत्ता, उत्पन्न, संपत्तीचा तपशील तसेच काळा पैसा पांढरा करणाऱ्या अर्थात मनी लाँडरिंगविषयक घडामोडींचा आढावा घेण्यास या संस्थांना सांगण्यात आले होते. 
बातम्या आणखी आहेत...