आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर चुकवून अति खर्च कराल तर खबरदार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भविष्यात काळा पैसा ठेवणार्‍यांना चाप बसवण्यासाठी सरकारने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार लोकांच्या अनावश्यक खर्चावर नजर ठेवण्याची तयारी करत आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असून त्यानुसार मोठ्या खर्चाबरोबरच लहान मोठ्या देवाणघेवाणवरदेखील लक्ष ठेवण्यात येणार आहे.

देशातील काळ्या पैशावर नजर ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. हे एक प्रकारचे विश्लेषणात्मक तंत्रज्ञान असणार आहे. ज्याची स्थापना आगामी तीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सरकारच्या वतीने लवकरच यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.

एखाद्या व्यक्तीने जाहीर केलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केल्यास अशा व्यक्तीला पकडण्यात हे तंत्रज्ञान मदत करणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने देण्यात येणार्‍या आकडेवारीचे विश्लेषण करण्याचे काम हे तंत्रज्ञान करणार आहे.

सरकारची नजर
या योजनेसाठी सरकारच्या वतीने धिम्या गतीने माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वास्तविक ५ ते १० कोटी रुपयांच्या व्यवहारावर नजर ठेवण्यासाठी सरकारकडे आधीच एक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र, हे नवे तंत्रज्ञान ५० लाख रुपयांच्या खर्चावरदेखील लक्ष ठेवू शकणार आहे.
बातम्या आणखी आहेत...