आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लावतनिक आहेत ब्रिटनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती, 29 व्या वर्षी स्‍वत:च्‍या कंपनीची स्‍थापना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युक्रेनमध्ये लेन ब्लावतनिक यांचा जन्म झाला. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये सुरुवातीचे शिक्षण झाले, तर अमेरिकेत कोलंबिया आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये उच्च शिक्षण घेतले. हे ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी आहेत. सध्या यांचे वास्तव्य न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये असते. यांचा उद्योग जगभरात पसरलेला आहे. केमिकल कंपनी लॉयोनडेलबासेल आणि मीडियामध्ये वॉर्नर म्युझिक कंपनीचा समावेश आहे. २०१३ मध्ये यांनी रशियन ऑइल कंपनी टीएनके-बीपीचे आपले शेअर्स ७ अब्ज डॉलर्समध्ये विकले होते. त्यानंतर सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींत गणना झाली.
 
लेन यांचे संपूर्ण नाव- लियोनीद वालेनटिनोविच ब्लावतनिक. जन्म १९५७ मध्ये युक्रेनच्या आेडिस्सा येथे झाला. तेव्हा हा प्रदेश सोव्हिएत संघात होता. १९ वर्षांच्या वयात त्यांनी मॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. त्याच वेळी नेमका एमिग्रेशनचा वाद सुरू झाला. हे कुटुंब अमेरिकेच्या ब्रुकलीन येथे स्थलांतरित झाले. तेव्हा त्यांचे वय २१ होते. कोलंबिया येथून त्यांनी संगणकशास्त्रात पदवी मिळवली.
 
नोकरी करू लागले. त्यानंतर १९८६ मध्ये आपली गुंतवणूक कंपनी स्थापन केली- अॅक्सिस इंडस्ट्रीज. याच्या तीन वर्षांनंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये पदवी शिक्षण घेतले. याचदरम्यान मॉस्कोतील जुना वर्गमित्र व्हिक्टर वेक्सलबर्गच्या संपर्कात आले. त्यांनी मिळून काम करण्याचा प्रस्ताव दिला. ब्लावतनिक रशियात परतले. या वेळी रशियात खासगीकरणाची प्रक्रिया वेगात सुरू होती. 

तेव्हा व्लादिमीर ट्रॅक्टर वर्क आपल्या कर्मचाऱ्यांना स्टॉक व्हाउचर वाटत होते. ब्लावतनिक यांनी संधीचा फायदा घेतला. कर्मचाऱ्यांकडून भाग खरेदी केले आणि कंपनीचे मालक झाले. त्यानंतर ब्लावतनिक आणि वेक्सलबर्ग यांनी एका  प्रकल्पाचे भाग खरेदी केले. अॅल्युमिनियम कसे तयार केले जाते हे आपल्याला माहिती नाही, असे ते मित्राला म्हणाले. मात्र पैसा कसा तयार होतो हे मला माहीत आहे.
 
अॅल्युमिनियम निर्मिती हे तुझे काम असून पैसा वाढवणे माझे आहे, असे त्यांनी सांगितले. २००७ मध्ये त्यांची ही कंपनी रशियातील क्रमांक दोनची अॅल्युमिनियम उत्पादन कंपनी ठरली. नंतर या कंपनीचे जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या यूसी रुसेलमध्ये विलीनीकरण झाले. १९९६ मध्ये ब्लावतनिक यांनी प्रथमच एकट्याने एका बड्या कंपनीचे अधिग्रहण केले. यामागे एक रणनीती होती.  
 
वेक्सलबर्गसोबत सुरू केलेल्या कंपनीला इंधन स्रोताची गरज होती. कझाकिस्तान येथे जगातील सर्वात मोठी कोळसा खाण असून त्याचे खासगीकरण केले जात होते. कझाकी सरकारला रशिया त्यांच्या प्रदेशात घुसखोरी करण्याची शक्यता वाटत होती. त्यामुळे कोळसा खाणीसाठी अमेरिकेकडून गुंतवणूक होणे कंपनीला गरजेचे वाटत होते.
 
ब्लावतनिक अमेरिकन नागरिक होते. त्यामुळे अॅक्सिस  इंडस्ट्रीजकडून बोली लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला. २००५ मध्ये त्यांनी डच येथील केमिकल कंपनी पोलयोलिफिन्सचे अधिग्रहण केले. त्यानंतर लियोनडेर या केमिकल कंपनीचे १९ अब्ज डॉलरमध्ये अधिग्रहण केले. मात्र या करारानंतर ते आर्थिक अडचणीत आले. जानेवारी २००९ मध्ये त्यांनी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याची नोंद केली. २०१० मध्ये ते यातून सुटले. याच वर्षी चित्रपट वितरणाकडे लक्ष दिले. २०११ मध्ये त्यांनी वॉर्नर म्युझिक ग्रुपचे अधिग्रहण ३.३ अब्ज डॉलर्सला केले. कोळशापासून सुरू झालेला प्रवास संगीत क्षेत्रापर्यंत पोहोचला.
बातम्या आणखी आहेत...