आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blockbuster Deal In Multiplex Space: Carnival Acquires Anil Ambani\'s Big Cinemas For Rs 710 Crore

यांच्या एका फॉर्म्युल्याने इंम्प्रेस झाले होते ज्युनियर अंबानी, विकला BIG CINEMA

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीकांत भासी : कार्निव्हल सिनेमाचे प्रमुख
जन्म : नोव्हेंबर १९६८
शिक्षण : भोपाळ भेल शाळेतून प्राथमिक शिक्षण, बीएसएसमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले.
कुटुंब : वडील - सी. एम. भासी (सेवानिवृत्त),
आई- सी.पी. भासी, पत्नी - प्रेमा (गृहिणी) व दोन मुली.
मागील वर्षी रिलायन्सच्या बिग सिनेमाला विकत घेतल्यामुळे कार्निव्हल सिनेमाचे प्रमुख श्रीकांत भासी हे चांगलेच चर्चेत आले होते. श्रीकांत प्रथमच अनिल अंबानींना भेटले. अंबानी बिग सिनेमा खरेदी करण्‍यासाठी अनेक खरेदीदार तयार होते. मात्र, अनिल यांनी श्रीकांतची निवड केली.

उद्योजकतेत पाऊल टाकू इच्छिणा-यांनाच प्राधान्य द्यायचे, यावर अंबानींचा भर असतो. त्यामुळे श्रीकांतची निवड करण्यात आली. तुम्ही कसे काम करणार, असा प्रश्न अंबानींनी उपस्थित केला. श्रीकांत म्हणाले, अडीच तासांचा चित्रपट संपल्यानंतरही आम्ही प्रेक्षकांना मल्टिप्लेक्सच्या परिसरात ४ तास खिळवून ठेवू शकतो. अंबानींनी त्यांना कार्यपद्धती विचारली. त्यावर श्रीकांत उत्तरले, फूडकोर्ट व स्पा इत्यादींमुळे लोक तेथे हमखास थांबतीलच. एखादे कुटुंब सिनेमाला आले तर त्यांनी जेवणही तेथेच घेतले पाहिजे, अशी व्यवस्था मी उभारणार आहे. त्यामुळेच माझ्या समूहाचे नाव कार्निव्हल आहे, असे श्रीकांत यांनी सांगितले.

श्रीकांत यांचे बालपण भोपाळमध्ये गेले. सोयाबीन व अ‍ॅग्रो उत्पादनांसाठी ते काम करत. कमोडिटी बाजारातील अग्रणी बंज कंपनीत ते सल्लागारपदी होते. ते मूळचे केरळचे आहेत. मल्याळम सिनेमा उद्योगातही काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. चित्रपट निर्मिती सुरू केली. वर्ष २००० मध्ये मुंबईत आले. शर्मन जोशीचा ‘वार छोड ना यार’ हा चित्रपट त्यांनी निर्माण केला. भोपाळच्या प्रेमाशी त्यांचा विवाह झाला. कधी तरी घरात बोलता बोलता त्यांनी थिएटरविषयी चर्चा केली. मुलीने ती चर्चा ऐकून थिएटर जॉइन केले. थिएटरकडे किशोरवयीनांना आकर्षित करण्यासाठी शोच्या दरम्यान अमेरिकन बँड ‘वन डिरेक्शन’ दाखवावा, असे मुलीने सुचवले. श्रीकांतने हा प्रयोग केला. त्यांच्या बोरिवलीतील एचडीआयमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

पुढील स्लाईडवर बघा, श्रीकांत भासी यांचे सेलिब्रेटिंसोबतचे फोटो....