आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boy, 8, Expands Colorado Lemonade Stand Business To Four Cities

बाबांनी खेळणे दिले नाही, ८ वर्षांच्‍या मुलाने स्थापली कंपनी, १६ लाखांची उलाढाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - दोन वर्षांपूर्वी जॅब बोनियाे आठ वर्षांचा होता. त्याने वडिलांना एक खेळणे मागितले होते. ते महागडे असल्याने तू तुझे विकत घे, असे बाबांनी त्याला सांगितले. जॅकने पैसे जमवण्यासाठी बाबांच्याच मदतीने लिंबूपाण्याचे दुकान उघडले. ऐन उन्हाळा असल्याने योगायोगाने दुकान चांगलेच चालू लागले. विक्री वाढवण्यासाठी स्थानिक मंडईतही लिंबूपाणी विकले. पहिल्याच हंगामात जॅकने सव्वा लाखाचे लिंबूपाणी विकले. त्यात सुमारे साठ हजार रुपयांचा नफा झाला.

बोनियो कुटुंबाने या व्यवसायाला ‘जॅक स्टँड्स’ नाव दिले. आता जॅक दुकानांच्या शाखा सुरू करण्याच्या विचारात आहे. त्याने ‘यंग अमेरिकन्स बँके’कडून तीन लाखांचे कर्ज उचलले आहे. ही बँक मुलांनाच कर्ज देते. जॅकने वेबसाइट तयार केली आणि तीन मंडयांत दुकाने उघडली. काम वाढल्याने त्याने ७ ते ११ वर्षांपर्यंतची मुले सेल्स टीममध्ये ठेवली. सुट्यांत कमाईची इच्छा असलेली मुले त्याच्याकडे येऊ लागली. जॅक त्यांना स्टँडवर काम करणे, शिफ्ट संपल्यानंतर पैसे मोजणे, नफा-तोटा समजावून सांगू लागला. शिफ्ट संपल्यानंतर मुलांना विक्रीच्या हिशेबाने दोन ते तीन हजार रुपये सुटू लागले. गतवर्षी सुट्यांत ‘जॅक स्टँड्स’मध्ये २०० मुले काम शिकली.
जॅक आता १० वर्षांचा आहे. त्याने यंग अमेरिकन्स सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशनमध्ये प्रवेश घेतला अाहे. हे केंद्र ६ ते २१ वर्षे वयाच्या मुलांना अर्थशास्त्राचे बारकावे शिकवते.
जॅकला त्याच्या बाबांनी मदत केली, पण मुलाने मेहनत करावी, यावरही भर दिला. घराजवळ दुकान उघडले तेव्हा जॅक घरातील फ्रिजमधून बर्फ व कप तर नेणार नाही, याकडेही नजर ठेवली. म्हणजेच त्याने मेहनतीविना नफा मिळवला असता तर तो काहीच शिकला नसता. त्याला गणिताच्या मूलभूत बाबी शिकवल्या. शाळेतही त्याला याचा फायदा झाला. तो सध्या पाचवीत शिकतोय, पण सातवीची गणितेही सहजपणे सोडवतो. त्याला वस्तूंचे घाऊक भाव, विक्री कर परवान्याच्या अर्जाची पद्धत, बिझनेस रिलेशन सर्वकाही माहीत आहे. गतवर्षी जॅकने १६ लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला. काही दिवसांआधी त्याने ‘जॅक मार्केटप्लेस’ही उघडले. येथे १८ वर्षांपर्यंतच्या मुलांनी तयार केलेल्या वस्तू विकल्या जातात.
पुढील स्‍लाइड्वर वाचा, मी ‘जॅक स्टँड्स’चा सीईओ आहे...