आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसई एसएमई मंचावर नाेंदणी करणाऱ्या कंपन्यांचे शतक पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई लघु अाणि मध्यम उद्याेगातील कंपन्यांना भांडवल उभारणी करणे नेहमीच जिकिरीचे ठरते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी मुंबई शेअर बाजाराने २०१२ मध्ये एसएमई कंपन्यांना शेअर बाजारात नाेंदणी करण्याची सुविधा करून दिली. गेल्या तीन वर्षांत नाेंदणी करण्याचे प्रमाण वाढत अाहे.
गुरुवारी अाणखी पाच कंपन्यांचा प्रवेश झाल्यानंतर अाता एसएमई मंचावर नाेंदणी करणाऱ्या कंपन्यांचे शतक पूर्ण झाले अाहे. गाला प्रिंट सिटी, एमडी इंडक्टाे कास्ट, लाॅयाल इक्विपमेंट्स, जिव्हा इकाे प्राॅडक्ट्स अाणि मॅजेस्टिक रिसर्च सर्व्हिसेस अँड साेल्युशन्स या पाच कंपन्यांनी गुरुवारी एसएमई मंचावर नाेंदणी केली.
भांडवल बाजारात नाेंदणी करण्यासाठी सक्षम असलेल्या हजाराे एसएमई कंपन्या अाहेत. त्यामुळे पुढील दाेन ते तीन महिन्यांत अाणखी २० ते २५ कंपन्यांची नाेंदणी हाेण्याची शक्यता असल्याचे मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक अाशिषकुमार चाैहान यांनी सांिगतले. अाणखी १०० कंपन्यांची नाेंदणी हाेण्याचा अाशावादही त्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...