आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Builder developers Flat Size Has Been Reduced To 26 Percent

बिल्डर-डेव्हलपर्सनी फ्लॅटचे आकारमान २६ टक्क्यांनी घटवले, किमती नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिल्डर-डेव्हलपर्सनी गेल्या पाच वर्षांत अपार्टमेंट्सचे आकारमान २६ टक्क्यांनी लहान केले आहे. मात्र, फ्लॅट-घरांच्या किमती घटवण्यात आलेल्या नाहीत. प्रॉपर्टी कन्सल्टंट फर्म जेएलएल इंडियाच्या अहवालात याची माहिती देण्यात आली आहे. जेएलएलने मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे, बंगळुरूसह सात मोठ्या शहरांतील सर्व्हेच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे.

त्यानुसार, रिअल इस्टेट बाजारातील सुस्तीचा मुकाबला करण्यासाठी डेव्हलपर्स जास्तीत जास्त फ्लॅट विकण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. फ्लॅटचा आकार घटवून त्यांनी फ्लॅट्सची संख्या वाढवली आहे. मात्र, त्यांनी फ्लॅटच्या किमतीत प्रति चौरस फुटाच्या आधारे कोणतीही कपात केलेली नाही. डेव्हलपर्सनी मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक फ्लॅट आकारमान घटवले आहे. या क्षेत्रात मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याचा समावेश आहे. येथे इतर शहरांच्या तुलनेत आधीच फ्लॅटचे आकारमान कमी आहे. यानंतर बंगळुरू, कोलकाता आणि चेन्नईचा क्रमांक आहे. दिल्ली एनसीआर, हैदराबाद आणि पुण्यातही हाच कित्ता गिरवण्यात आला आहे.
जेएलएलचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले की, महागडे अपार्टमेंट विकली जात नाहीय. यामुळे ग्राहकांच्या सोयीकडे बघता बिल्डर नवनव्या पद्धती अवलंबत आहेत. एफएमसीजी कंपन्यांनी १९९० च्या दशकात जशी सॅशे मार्केटिंगची रणनीती अवलंबली होती, आता बिल्डर त्याच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत. ते आकार कमी करून जास्तीत जास्त फ्लॅट विक्रीच्या प्रयत्नात आहेत. शहरातील खरेदीदारांची आॅफिसच्याच जवळपास घर घेण्यास पसंती असते, भले मग ते लहान असले तरी चालते. ते फक्त आपल्या गरजेनुसार असावे. तथापि, ते आपल्या जीवनशैलीसोबत तडजोड करत आहेत, असा त्याचा अर्थ नाही. उलट त्यांना सर्व सुविधायुक्त छाेटे, पण टुमदार घर हवे आहे.
मुंबई २६.४%
बंगळुरू २३.७%
दिल्ली ९.७%
पुणे ७.०%
हैदराबाद ६.५%